Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

कोरची ग्रामीण रुग्णालयात सदोष विद्युत जोडणीमुळे नेहमी होते राहते खंडीत,अतिआवश्यक वेळीच सुरू केले जाते जनरेटर!

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

गडचिरोली दि ५ सप्टेंबर : कोरची ग्रामीण रुग्णालयावर संपूर्ण आरोग्य विभागाचा भार असून येथील विद्युत जोडणीमध्ये सदोष आहे .त्यामुळे वेळोवेळी विद्युत खंडित होत असते .ग्रामीण रुग्णालयात नवनवीन यंत्रसामग्री  उपलब्ध असून रुग्णासाठी  वेळेवर  उपयोगी पडत नसल्याचे दिसून येते.

ग्रामीण रुग्णालयातील  विद्युत जोडणी योग्य प्रकारे केली नसल्याने वेळीच विद्युत बंद चालू होत असते, रुग्णालयात विद्युत जोडणीसाठी वापरण्यात आलेले वायर आणि इतर साहित्य निम्न दर्जाचे वापरण्यात आले आहे. त्यामुळे येथील विद्युत नेहमीच सदोष असल्याने खंडित होत असल्याने याचा फटका रुग्णालयात उपचार घेत असलेल्या सामान्य रुग्णाला सोसावा लागतो.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

रुग्णालयाचे बांधकाम सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत करण्यात  येत असून  विद्युत जोडणी हि पूर्ण करून आरोग्य विभागाला रुग्णालयाची  सुपूर्द करण्यात  आली आहे .त्यावेळीपासूनच विद्युत जोडणीत दुर्लक्ष झाले असल्याचे समोर आले आहे .या संदर्भातील लोकस्पर्श न्यूज च्या प्रतिनिधीने  वैद्यकीय अधिक्षक डा. बागराज धुर्वे यांच्याशी या विद्युत समश्या संदर्भात विचारले असता बांधकाम विभागाकडे यापूर्वी बऱ्याचदा मागणी केली आहे.परंतू विद्युत अद्याप दुरुस्त करून मिळाली नाही. असे स्पष्ठ सांगितल्याने कोरची  ग्रामीण रुग्णालयातील विद्युत सदोष असल्याचे स्पष्ठ झाले आहे .

कोरची तालुकातील बांधकाम विभागात दुर्लक्ष करीत असल्याने सदैव  भोंगळ कारभाराविषयी  चर्चेत राहते. या रुग्णालयात जनरेटर ची सुविधा उपलब्ध असली तरी ते  फक्त अतिआवश्यक काळातच सुरू केली जातात. मिळालेल्या  माहितीनुसार डिझेलचा पुरवठा होत नसल्यामुळे सदर जनरेटर हे फक्त अतिआवश्यक वेळेत सुरू केले जात असल्याने रुग्णालयात रुग्णांचे हाल होत असल्याचे स्पष्ठ दिसून येते.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

रुग्णालयात घाणीचे साम्राज्य….

ग्रामीण रुग्णालय कोरची येथे नेहमीच घाणीचे साम्राज्य बघितले जात असून यावर रुग्णाच्या आरोग्यावर वाईट परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही. मागील दोन वर्षापासून सर्वत्र थैमान घातलेल्या कोरोना विषाणू मुळे बहुतेक रुग्णांनी आपला जीव गमावला आहे व सर्वत्र स्वच्छतेचे संदेश देणाऱ्या आरोग्य विभागात घाणीचे साम्राज्य असल्यामुळे प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे.

गडचिरोली जिल्ह्यात ३० ऑगस्ट ते ०६ सप्टेंबर पर्यंत कायाकल्प चमूचा दौरा असून ‘कायाकल्प पुरस्कार’ प्राप्त करण्याकरिता ग्रामीण रुग्णालय कोरची येथे बाहेरचे मजूर लावून युद्धपातळीवर साफसफाईचे कार्य सुरू असल्याचे दिसून येत आहे. रुग्णांना शौचालयात पाणी मिळत नसल्यामुळे त्यांना इकडे तिकडे भटकंती करावी लागत आहे. शौचालय पूर्णतः खराब झाले आहेत. त्यामुळे तेथे जाण्याची इच्छा होत नाही.

ग्रामीण रुग्णालय येथे सद्यस्थितीत दोन बोअर असून त्या बोअरच्या खोदकामात सुद्धा खूप मोठे भ्रष्टाचार झाले असल्याची माहिती प्राप्त झाली आहे. परिसर स्वच्छ ठेवन्याकरीता जर कायकल्प चमूची प्रतीक्षा केली जात असेल तर दर आठवड्याला अशा चमूने तालुक्यात भेट द्यावी अशी अपेक्षा रुग्णालयातर्फे केली जात आहे.

०४ सप्टेंबरला अन्याय, अत्याचार, भ्रष्टाचार विरोधी समिती कोरचीच्या पदाधिकाऱ्यांनी ग्रामीण रुग्णालय कोरची येथे भेट दिली असता तापाने ग्रासलेल्या लहान चिमुकल्यांना त्यांच्या आई कापडाने हवा घालीत असल्याचे दिसून आले. तर मग लाखो रुपयाची वस्तू ही फक्त रुग्णालयाची शोभा वाढवण्यासाठी आहे का? असा प्रश्न निर्माण होत आहे.

ग्रामीण रुग्णालय कोरची येथे रुग्णांना तातडीने मूलभूत सुविधा देण्यात यावी अन्यथा लवकरच आंदोलन केले जाईल असा इशारा अन्याय, अत्याचार, भ्रष्टाचार विरोधी समिती कोरचीचे तालुका अध्यक्ष आशिष अग्रवाल, तालुका सचिव सिद्धू राऊत, शहर अध्यक्ष चेतन कराडे, जितेंद्र सहारे, श्‍याम यादव, अभिजित निंबेकर, धम्मदीप लाडे, चंदू वालदे, निखिल साखरे, भुमेश शेंडे, कृष्णा वंजारी, बंटी जनबंधू, भूषण तेलासी, पप्पू सिंन्हा आदींनी दिला आहे.

हे देखील वाचा,

Loksparsh Exclusive : त्या…नरभक्षक वाघाने घेतला तीन वर्ष्यात अकरा जनांचा बळी, मानवी जीवितास धोका ठरलेल्या वाघाला जेरबंद करण्याचे प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव)यांचे आदेश,

अबब… केंद्र सरकारकडून महाराष्ट्राला जीएसटी परताव्याचे तब्बल 25 हजार 334 कोटी रुपये येणे बाकी.. !

 

Comments are closed.