Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

पनवेल-अंधेरी लोकल गोरेगावपर्यंत धावण्यास सुरुवात

प्रवासी संघाच्या प्रयत्नांना यश; पश्चिम मार्गावर जाणाऱ्या नोकरदार वर्गाचा प्रवास होणार सुकर...

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क 

रायगड, दि. १ डिसेंबर :नवेल- अंधेरी ही लोकल गाडी आजपासून गोरेगाव स्थानकापर्यंत धावण्यास सुरुवात झाली आहे. पनवेल रेल्वे स्थानकात या गाडीला हिरवा झेंडा दाखवण्यात आला असून प्रवासी संघाच्या मागणीला यश आले आहे.

यावेळी प्रवासी संघाचे अध्यक्ष व रेल्वे स्थानक सल्लागार समितीचे सदस्य डॉ. भक्तीकुमार दवे, मध्य रेल्वे सल्लागार समिती सदस्य अभिजीत पाटील, श्रीकांत बापट, सुदाम पाटील यांच्यासह प्रवासी संघाचे पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

त्याचबरोबर पनवेल रेल्वे स्थानकावरील टॉयलेट्स, बसण्याचे बाक, लिफ्ट, पिण्याच्या पाण्याची सोय आदी समस्यांबाबत रेल्वेकडे यापूर्वीपासूनच पाठपुरावा केला असून रेल्वेने या समस्या सोडवण्याचे आश्वासनही दिले असून त्यादृष्टीने कामाला सुरुवात देखील झाली असल्याचे मध्य रेल्वे सल्लागार समिती सदस्य अभिजित पाटील यांनी सांगितले.

हे देखील वाचा : 

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

कौटुंबिक न्यायालय परिसरात पतीने पाडला पत्नीचा दात

शिक्षकाने सातव्या वर्गातील विद्यार्थीनीचा केला विनयभंग!

कासवाची शिकार करणाऱ्या चार आरोपींना अटक; वनविभागाची धडक कारवाई

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.