Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

शिक्षकाने सातव्या वर्गातील विद्यार्थीनीचा केला विनयभंग!

गुरु शिष्याच्या पवित्र नात्याला काळीमा फासणारी घटना रायगड जिल्ह्यातील पाली येथे घडली आहे.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

रायगड, दि. १ डिसेंबर : पाली येथील ग. बा. वडेर हायस्कुलमध्ये पेपर चालू असतांना एका ज्येष्ठ शिक्षकाने इयत्ता सातवीत शिकणाऱ्या विद्यार्थीनीचा विनयभंग केल्याची घटना घडली आहे.

सदर घटना सोमवारी घडली असून मंगळवारी संध्याकाळच्या सुमारास या प्रकरणी पाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

भारतीय दंड संहीता कलम ३५४ (अ) (१) यासह लैंगिक अपराधांपासून बालकांचे संरक्षण अधिनियम २०१२ चे कलम ८, ९ (एफ)(एम), १० नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या घटनेचा अधिक तपास पाली पोलीस ठाण्याचे निरीक्षक विजय तायडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक तृप्ती बोराटे करीत आहेत.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

हे देखील वाचा : 

कौटुंबिक न्यायालय परिसरात पतीने पाडला पत्नीचा दात

तू माझी नाही तर कुणाचीही नाही; लग्नास नकार दिल्याने प्रियकराने केली आपल्याच प्रियसीची हत्या!

सार्वजनिक ठिकाणी मास्क असलेल्या व कोरोना लसीकरण झालेल्यांनाच प्रवेश

 

Comments are closed.