Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

वाघाने केली गाईची शिकार; हुसकावण्यासाठी गेलेल्या गावकऱ्यांंवर जेव्हा वाघ चवताळतो तेव्हा …

चंद्रपूर शहराजवळील भटाळी गावातील घटना.. ही चित्तथरारक घटना कॅमेऱ्यात कैद.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

चंद्रपूर, दि. २३ डिसेंबर : वाघाने गाईची शिकार केल्याने गावकऱ्यांनी घटनास्थळी जात वाघाला हुसकावून लावण्याचा प्रयत्न केला. यानंतर वाघ आणि गावकरी समोरासमोर आले. मात्र, गावकऱ्यांना पाहून वाघ जास्तच चवताळला. वाघाने आक्रमक पवित्रा घेतल्याचं पाहताच गावकऱ्यांनी याठिकाणाहून पळ काढला. ही चित्तथरारक घटना चंद्रपूर शहराजवळील भटाळी गावात उघडकीस आली आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

चंद्रपूर शहराजवळील भटाळी गावत इरई नदीच्या पात्रात काल दुपारच्या सुमारास वाघाने गाईवर हल्ला करत तिची शिकार केली. यावेळी गुराख्याने आरडाओरड करून वाघाला पिटाळून लावले आणि गावात जाऊन गायीच्या मालकास व लोकांना याची माहिती दिली. थोड्या वेळाने गायमालक व गावकरी घटनास्थळी आले. मात्र इतक्या वेळात वाघ आपल्या शिकारीसाठी परत आला होता.

त्या ठिकाणी लोकांची एकाच गर्दी जमली होती. पट्टेदार वाघ समोरून घटनास्थळावर जमलेल्या लोकांच्या दिशेने येत होता. यानंतर वाघ आणि गावकरी समोरासमोर आले. घाबरगुंडी उडालेली या लोकांनी आरडाओरड करण्यास सुरुवात केली. त्यामुळे वाघ दूर थांबून जागीच बसला.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

वाघाने केलेल्या शिकारीवर ताव मारण्याचा ठिकाणी लोकांची गर्दी बघून वाघ अधिकच खवळलेल्या स्थितीत होता. त्याची एकटक नजर लोकांकडे व शिकारी वर खिळली होती. लोकांची गर्दी व झालेल्या आरडाओरड यानंतरही वाघ माघारी परतला नाही.

वाघाची आक्रमकता बघून गावकऱ्यांनी वेळ वाया न दवडता घटनास्थळावरून पळ काढला. ही एक पट्टेदार वाघीण असून या परिसरात तिचा वावर आहे. या घटनेमुळे भटाळी गावात दहशतीचे वातावरण पसरले आहे.

हे देखील वाचा : 

महिला प्रवाशांच्या दागिन्याची चोरी करणाऱ्या सासू-सुनेला अटक; ४ लाख २७ हजार रुपयांचा ऐवज पोलिसांनी केला जप्त

भंगार धातूचा वापर करून चारचाकी वाहन बनवणाऱ्या माणसाला आनंद महिंद्रा देणार बोलेरो भेट

गडचिरोली पोलीस दादालोरा खिडकीच्या माध्यमातून आरोग्य शिबिर व जनजागरण मेळावा संपन्न

 

 

Comments are closed.