Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

महिला प्रवाशांच्या दागिन्याची चोरी करणाऱ्या सासू-सुनेला अटक; ४ लाख २७ हजार रुपयांचा ऐवज पोलिसांनी केला जप्त

सासू-सुनेची चोरी सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद.. चोरी करणाऱ्या दोन महिलांना कल्याण रेल्वे स्थानकातून अटक.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

कल्याण, दि. २३ डिसेंबर :  कल्याण रेल्वे स्थानकावरील धावत्या ट्रेनमध्ये चोरीच्या घटना नेहमीच घडत असतात. मात्र यावेळी चोऱ्या करणाऱ्या एका जोडीचा पोलिसांनी भांडाफोड केला आहे. रेल्वे स्थानकात मोबाईलवर डोळा ठेवून चोऱ्या करणारी ही जोडी दुसऱ्या तिसऱ्या कुणाची नाही, तर चक्क सासूसुनेचीच असल्याचं उघड झालंय. या दोघींनीही कल्याणमधून अटक करण्यात आली असून रेल्वे क्राईम ब्रांचनं ही कारवाई केली आहे.

 

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

उल्हासनगरमध्ये राहणाऱ्या संगीता अरुण डोमाळे (४२) यांनी कल्याण रेल्वे स्टेशन फलाट क्रमांक ४ वर आलेल्या डाऊन गाडी नंबर १७६१७ तपोवन एक्सप्रेस गाडीचे भोगी नंबर डी-७ या डब्यात प्रवाशांच्या गर्दीत चढत असताना अज्ञात चोरट्याने त्यांच्या शोल्डर पर्सची चेन खोलून आतील मनी पर्स त्यातील रुपये ३ लाख २४०० किंंमतीचे सोन्याचे दागिने चोरी झाल्याबाबत दि. ११ डिसेंबर २०२१ रोजी कल्याण रेल्वे पोलिस ठाणे येथे तक्रार दिली होती.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

त्यानंतर पोलिसांनी आपल्या तपासाची सूत्र हलवत कल्याणच्या प्लॅटफॉर्म नंबर  ४ वरील सीसीटीव्ही फुटेज तपासलं. पोलिसांनी  बारीक नजर ठेवत सीसीटीव्ही तपासली असता एका व्हिडीओत दोन महिला पळ काढताना आढळून आल्या.

या दोन्ही महिला सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाल्यानं पोलिसांचं काम अधिकच सोपं झालं. पोलिसांनी या दोन्ही महिलांना सापळा रचून ताब्यात घेतले पोलिसांच्या माहितीनुसार अटक कऱण्यात आलेल्या सासूचं नाव रेखा कांबळे (४६) असं असून सुनेचं नाव रोझा कांबळे (२२) आहे.

या दोघींची चौकशी केली असता त्या कर्नाटक राज्यातील गुलबर्गा येथील रहिवासी असल्याचे सांगत तीन गुन्ह्याची कबुली दिली असून त्यांच्याकडून ४ लाख २७ हजार रुपयांचा ऐवज जप्त केला आहे.

सदरची कामगिरी कैसर खालिद पोलीस आयुक्त लोहमार्ग मुंबई, डॉ. संदीप भाजीभाकरे पोलीस उपायुक्त पश्चिम परिमंडळ यांच्या आदेशाप्रमाणे गजेंद्र पाटील वरिष्ठ पोलीस निरीक्षक गुन्हे शाखा लोहमार्ग मुंबई यांचे मार्गदर्शनाखाली सपोनि शेख, सपोनि साठे,  पोउनी दीपक शिंदे,  सपोउनि कदम व आदी पोलीस हवालदारांनी चोरी करणाऱ्या दोन महिलांवर वरीलप्रमाणे कारवाई केली आहे.   

 

हे देखील वाचा : 

भंगार धातूचा वापर करून चारचाकी वाहन बनवणाऱ्या माणसाला आनंद महिंद्रा देणार बोलेरो भेट

प्रख्यात लावणी सम्राज्ञी चैत्राली राजे ‘ओटीटी’व्दारे आणणार लावणी;लावणीला मिळणार आता नवे व्यासपीठ

गडचिरोली पोलीस दादालोरा खिडकीच्या माध्यमातून आरोग्य शिबिर व जनजागरण मेळावा संपन्न

 

Comments are closed.