Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

गडचिरोली ते मुल सेक्शन एनएच-९३० मार्गावरील वैनगंगा नदीवरील वाहतूकीकरीता पर्यायी मार्गाचा वापर

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

गडचिरोली, दि. २३ डिसेंबर : गडचिरोली ते मुल सेक्शन एनएच-९३० मार्गावरील वैनगंगा नदीवरील मोठया पुलाच्या Bearing ची तपासणी व दुरुस्ती करणे आवश्यक आहे. याकरीता एक महिण्याचा कालावधी लागणार असून दिनांक २० डिसेंबर २०२१ ते  १९ जानेवारी २०२२ या कालावधीत light vehicles ची वाहतूक दररोज ४ तास बंद करणे व जड वाहनांची वाहतुक पर्यायी मार्गानी (गडचिरोली-चामोर्शी-मुल रोड मार्गानी) वळविण्यास कळविले आहे.

त्याअनुषंगाने जड वाहनांची वाहतूक जसे ट्रक/बस इत्यादी दिनांक २४ डिसेंबर २०२१ ते २१ जानेवारी २०२२ पर्यतच्या कालावधीकरीता पर्यायी मार्ग म्हणून गडचिरोली-चामोर्शी-मुल रोड या मार्गाचा वापर करण्यास मान्यता देण्यात येत आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

तसेच light vehicles जसे Car/Jeep/Ambulance इत्यांदी वाहतूक दिनांक २४ डिसेंबर २०२१ ते २१ जानेवारी २०२२ पर्यत सकाळी ६.०० वाजेपासून ते सकाळी १०.०० वाजेपर्यतच्या कालावधी करीता बंद ठेवण्यात येऊन उर्वरीत कालावधीकरीता सुरु ठेवण्यास मान्यता देण्यात येत आहे. असे जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी, गडचिरोली यांनी कळविले आहे.

हे देखील वाचा : 

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

वाघाने केली गाईची शिकार; हुसकावण्यासाठी गेलेल्या गावकऱ्यांंवर जेव्हा वाघ चवताळतो तेव्हा …

भंगार धातूचा वापर करून चारचाकी वाहन बनवणाऱ्या माणसाला आनंद महिंद्रा देणार बोलेरो भेट

महिला प्रवाशांच्या दागिन्याची चोरी करणाऱ्या सासू-सुनेला अटक; ४ लाख २७ हजार रुपयांचा ऐवज पोलिसांनी केला जप्त

 

 

Comments are closed.