Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या निमित्ताने किल्ला पर्यटनाला दिमाखात प्रारंभ

चंद्रपूरचे जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी केला हेरिटेज वॉक.. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन; चंद्रपूर जेसीआयचा सहभाग...

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

चंद्रपूर, दि. २३ डिसेंबर : गोंडकालीन वैभवशाली परंपरा लाभलेल्या आणि इतिहासाची साक्ष देत असलेल्या चंद्रपूर किल्ल्याची हेरिटेज वॉकच्या माध्यमातून महती सांगण्यासाठी स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या निमित्ताने किल्ला पर्यटनाला बुधवार दि. २२ पासून दिमाखात प्रारंभ झाला.

गोंडकालीन किल्ला-परकोट व ऐतिहासिक स्मारक पर्यटन ‘हेरीटेज वॉक’ या इको-प्रोतर्फे आयोजित कार्यक्रमात जिल्हाधिकारी अजय गुल्हाणे यांच्या प्रमुख उपस्थितीत शुभारंभ करण्यात आला.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

बुरूज ४ बगड खिडकी वरून हेरीटेज वॉक या उपक्रमाचा शुभांरभ करण्यात आला. यावेळी चंद्रपूर जेसीआय चे पदाधिकारी, नागरीक व इको-प्रो चे पदाधिकारी व सदस्य सहभागी झाले होते. थंडीत पर्यटनकरीता नागरीक हेरीटेज वॉकसाठी एकत्रीत जमा झाले होते. यादरम्यान जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी गोंडकालीन स्थापत्यकला असलेले किल्ला परकोटाचे बांधकाम, बुरूज-खिडक्या, पादचारी मार्ग तसेच गोंडकालीन इतिहास समजून घेतला.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

यावेळी जिल्हाधिकारी अजय गुल्हाणे यांनी रामाळा तलावाच्या वरच्या बाजुस असलेल्या किल्ला परकोटाच्या बुरूज क्रमांक ४ वरून किल्ला व तलावाची पाहणी करीत २० वर्षापुर्वी रामाळा तलाव पर्यटन विकासाच्या वेळेस तयार करण्यात आलेला एकदेउळ ते बगड खिडकी पर्यतच्या मार्गाची पाहणी केली. सोबतच किल्लावरून हेरीटेज वॉक करताना बगड खिडकीपासून तयार करण्यात आलेली संरक्षण भिंत व त्यामधुन तयार होणार पाथवे व सायकल ट्रॅक बाबत माहीती घेतली. हेरीटेज वॉक सलग सुरळीत-सुरक्षीत व्हावे याकरिता यादरम्यान असलेले अडथळे विषयी माहीती जाणुन घेतली.

यावेळी जिल्हाधिकारी अजय गुल्हाणे यांनी चंद्रपूर शहराचा वैभवशाली इतिहास, अनेक गोंडराजे यांच्या पराक्रमाच्या गाथा, रंजक असा इतिहास आहे, अनके वास्तु-स्मारक आहे जे पर्यटकांना आकर्षित करू शकतात. अनेक स्थानिक नागरीकांना याबाबत माहीती नाही, त्यांना सुध्दा या हेरीटेज वॉक उपक्रमातून माहीती मिळत आहे. अशा इतिहासाला उजाळा मिळत असुन, हा हेरीटेज वॉक निश्चीतच चंद्रपूरचे पर्यटन विकासाची संभावना अधिक आहे. ताडोबाला येणाऱ्या पर्यटकांना सुध्दा मोठी पर्वणी उपलब्ध होउ शकते. येत्या काळात शहरातील पर्यटन विकासासाठी पुढाकार घेतला जाईल, असे मत व्यक्त केले.

सदर उप्रकमाचे आयोजन इको-प्रो संस्था, जिल्हाधिकारी कार्यालय, भारतीय पुरातत्व विभाग व चंद्रपुर जेसीआय यांच्या सहकार्याने करण्यात आले होते.

हे देखील वाचा : 

वाघाने केली गाईची शिकार; हुसकावण्यासाठी गेलेल्या गावकऱ्यांंवर जेव्हा वाघ चवताळतो तेव्हा …

महिला प्रवाशांच्या दागिन्याची चोरी करणाऱ्या सासू-सुनेला अटक; ४ लाख २७ हजार रुपयांचा ऐवज पोलिसांनी केला जप्त

भंगार धातूचा वापर करून चारचाकी वाहन बनवणाऱ्या माणसाला आनंद महिंद्रा देणार बोलेरो भेट

 

 

Comments are closed.