Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

गडचिरोली जिल्ह्यात आज 232 कोरोनामुक्त, 3 मृत्यूसह 108 नवीन कोरोना बाधितांची नोंद

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

गडचिरोली, दि. 28 मे : आज जिल्हयात 108 नवीन कोरोना बाधित आढळून आले. तसेच आज 232 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रूग्णालयातून घरी सोडण्यात आले. यामुळे जिल्हयातील आत्तापर्यंत बाधित 29140 पैकी कोरोनामुक्त झालेली संख्या 27301 वर पोहचली. तसेच सद्या 1129 सक्रिय कोरोना बाधितांवर उपचार सुरू आहेत.

आत्तापर्यंत जिल्हयात एकुण 710 जणांचा मृत्यू कोरोनामुळे झाल्याची नोंद आहे. आज 3 नवीन मृत्यूमध्ये ता. धानोरा जि. गडचिरोली येथील 55 वर्षीय पुरुष, ता. नागभिड जि. चंद्रपूर येथील 45 वर्षीय पुरुष, रा. मुरखडा ता. गडचिरोली जि. गडचिरोली येथील 63 वर्षीय पुरुष यांचा नवीन मृत्यूमध्ये समावेश आहे. यामूळे जिल्हयातील कोरोना रूग्ण बरे होण्याचे प्रमाण 93.69 टक्के, सक्रिय रूग्णांचे प्रमाण 3.87 टक्के तर मृत्यू दर 2.44 टक्के झाला.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

Corona Gadchiroli

नवीन 108 बाधितांमध्ये गडचिरोली तालुक्यातील 22, अहेरी तालुक्यातील 05, आरमोरी 05, भामरागड तालुक्यातील 09, चामोर्शी तालुक्यातील 23, धानोरा तालुक्यातील 01, एटापल्ली तालुक्यातील 01, कोरची तालुक्यातील 02, कुरखेडा तालुक्यातील बाधितामध्ये 04, मुलचेरा तालुक्यातील बाधितामध्ये 10, सिरोंचा तालुक्यातील बाधितामध्ये 11 तर वडसा तालुक्यातील बाधितामध्ये 15 जणांचा समावेश आहे.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

तर आज कोरोनामुक्त झालेल्या 232 रूग्णांमध्ये गडचिरोली मधील 56, अहेरी 19, आरमोरी 17, भामरागड 07, चामोर्शी 29, धानोरा 04, एटापल्ली 17, मुलचेरा 31, सिरोंचा 26, कोरची 01, कुरखेडा 05 तसेच वडसा येथील 20 जणांचा समावेश आहे.

हे देखील वाचा :

बुरशीजन्य आजार… म्युकरमायकोसीस!

(DFCCIL) डेडीकेटेड फ्रेट कोरीडोर कॉपोर्रेशन ऑफ इंडिया लि. मध्ये 1074 जागांसाठी अर्ज करण्यास मुदतवाढ

 

कोल्हापूर महानगरपालिकेत ८५ वैद्यकीय जागांसाठी भरती

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.