Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

मेड इन मुंबई लोको धावणार हिमाचल पर्वतात.

Get real time updates directly on you device, subscribe now.

मुंबईतून पाचवा झेडडीएम 3 नॅरो गेज इंजिन रवाना.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क:

मुंबई डेस्क, दि. १० नोव्हेंबर: मध्य रेल्वेच्या परळ लोको वर्कशॉपने कोरोना काळात उत्तर रेल्वेसाठी पाचवा झेडडीएम 3 नॅरो गेज इंजिन तयार करुन शनिवारी पाठविण्यात आला आहे. उत्तर रेल्वेच्या अंबाला विभागातील कालका – शिमला रेल्वे विभागातील प्रवासी आणि मालगाड्या चालविण्यासाठी या लोकोचा उपयोग केला जाणार आहे. कालका – शिमला रेल्वे ही एक 2 फूट 6 इंचाची (762 मिमी) गेजचा रेल्वे मार्ग आहेत. जी हिमालयाच्या पायथ्याशी असलेल्या कालका ते हिमाचल पर्वत प्रांतातील शिमलापर्यंत आहेत. हा रेल्वे मार्ग 97 कि.मी. लांबीच्या असून 1400 मीटर उंचीवर जाते. ह्या रेल्वेला युनेस्कोचा जागतिक वारसा प्राप्त आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

मध्य रेल्वेच्या परळ लोको वर्कशॉपला उत्तर रेल्वेने 2019 मध्ये 12 झेडडीएम-3 नॅरो गेज इंजिन तयार करण्याचा ऑर्डर दिला होता. त्यानूसार आतापर्यंत 12 पैकी चार इंजिने तयार करून पाठविण्यात आल्या आहेत.शविवारी पाचवा इंजिन तयार करुन पाठविण्यात आलेल्या आहे. आता उर्वरित 7 इंजिन तयार करण्याचे काम युध्दपातळीवर सुरु आहे. मार्च महिन्यात कोरोनामुळे संपुर्ण देशात लॉकडाउन लागू करण्यात आलेल्या होता. मात्र मर्यादित स्त्रोत आणि सोशल डिस्टंसिंगच्या निकषांचे पालन करून लोकोच उत्पादनाचे काम सुरु होते. लॉकडाऊन/अनलॉक कालावधी दरम्यान उत्पादित केलेला हा तिसरा इंजिन असल्याची माहिती मध्य रेल्वेने दिली आहे.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

इंजिनची वैशिष्ट्ये

कालका – शिमला रेल्वे मार्गांवर दोन्ही बाजूने चालविण्यासाठी व पुढे व्यवस्थित दिसण्यासाठी या इंजिनमध्ये दुहेरी कॅब प्रदान करण्यात? आली आहे. उत्तर भारतातील हिवाळ्यातील गंभीर परिस्थितीत काम करण्यासाठी इंजिन कोल्ड स्टार्टने सुसज्ज आहेत.आवश्यकतेनुसार इंजिन थंड करण्यासाठी ‘ऑन डिमांड कूलिंग सिस्टम’ ने देखील इंजिन सुसज्ज आहेत.एअर ब्रेक्स ब्रॉडगेज इंजिना सारखेच आहेत. डिझेल इंजिनच्या कार्यप्रदर्शनाची मापदंड इलेक्ट्रॉनिक स्क्रीनवर प्रदर्शित केली जातात.इंजिनमध्ये ऑटोमॅटिक इमर्जन्सी ब्रेकिंग, सतर्कता नियंत्रण डिव्हाइस आणि रेकॉर्डरसह इलेक्ट्रॉनिक स्पीडोमीटर सारख्या वैशिष्ट्यांसह सुरक्षितता सुविधा देखील उपलब्ध आहेत.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.