Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

भल्या पहाटेच ‘इथल्या’ मार्केटला लागली भीषण आग, एवढ्या दुकानाची झाली राखरांगोळी

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क 

धुळे : धुळे शहरातील मेन मार्केट असलेल्या पाचकंदील भागात शंकर मार्केटला आज भल्या पहाटे लागलेल्या आगीत मार्केट मधील जवळपास २५ ते ३० दुकाने जळून खाक झालेत. तासाभरातच आगीने रौद्ररूप धारण केले.

अमळनेर, दोंडाईचा,शिरपूर, धुळे येथील अग्निशमन बंबच्या मदतीने ही आग आटोक्यात आणली. लहान गल्लीमुळे आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी मोठी कसरत करावी लागली होती.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

धुळे शहरातील पाचकंदील परिसरातील शंकर मार्केटला आज पहाटे भीषण आग लागली. जुनी कपडा बाजारपेठ असल्याने रौद्ररूप धारण केलेल्या या आगीने बघता बघता झपाट्याने पसरत गेलेल्या आगीने तासभरात मार्केट मधील जवळपास २५ ते ३० दुकानांची राखरांगोळी केली आहे. वर पर्यंत धुराचे लोट बघून नागरिक भयभीत झाले होते. आग विझविण्यासाठी अमळनेर, शिरपूर व धुळे येथील अग्निशमन बंब घटनास्थळी बोलविण्यात आले.

तासापासून आग विझविण्यासाठी प्रयत्न करण्यात येत होते. मात्र या बाजारपेठेत लहान रस्ते असल्याने अग्निशमन बंब पोहचण्यासाठी मोठी कसरत करावी लागत होती. यामुळे आग विझविण्यासाठी अडचण निर्माण झाली होती. सुदैवाने यात कुठलीही जिवतहानी झालेली नाही. मात्र भल्या पहाटे झाले आगीच्या घटनेमुळे लाखोंचे नुकसान झाले आहे.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

हे देखील वाचा : 

प्राध्यापकांच्या 3064 रिक्त जागेची भरती प्रकिया लवकरच सुरु करणार – उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत

समाजातील अत्यंत दुर्लक्षित लालबत्ती एरियात काम करण्याची गरज – गिरीश कुलकर्णी

मराठा – ओबीसी आरक्षण आणि नवा राजकीय संघर्ष

Comments are closed.