Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

पहा कुठे मिळाले गडचिरोली पोलीस दलास नक्षल्याविरोधात मोठे यश, काय हस्तगत करण्यात झाले सफल?

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

गडचिरोली : गडचिरोली पोलीस दलास आज शुक्रवारी २ जुलै रोजी पोलीस स्टेशन एटापल्ली अंतर्गत येत असलेल्या कुदरी जंगल परिसरात नक्षल विरोधी अभियान राबवितांना नक्षल्यांनी पुरून ठेवलेली मोठी रोख रक्कम व स्फोटक साहीत्य हुडकून काढण्यात यश प्राप्त झाले आहे.

नक्षलविरोधी अभियान राबविणारे सी-६० व इतर अभियान पथकाचे जवान आज सकाळच्या सुमारास एटापल्ली तालुक्यातील पोलीस मदत केंद्र हालेवारा अंतर्गत येत असलेल्या कुदरी जंगल परिसरात नक्षल विरोधी शोधमोहीम राबवीत होते. या दरम्यान त्यांना एका ठिकाणी नक्षल्यांनी पुरून १५ लाख ९६ हजाराची रोख रक्कम, ३ नग डेटोनेटर, ४ नग इलेक्ट्रीक बटन, १ नग स्वीच,  २ नग वायर बंडल, १ नग वाकी टाकी, नक्षल पॉम्पलेट, बॅनर, पिटु व इतर साहित्य हस्तगत करण्यात यश प्राप्त झाले असून सदर साहीत्य गडचिरोली पोलीस मुख्यालय येथे आणण्यात आले असून या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु असल्याची माहिती पोलीस अधीक्षक कार्यालयाने प्रसिद्धी पत्रकाद्वारे माहिती दिली आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

हि कारवाई गडचिरोली जिल्हयाचे पोलीस अधीक्षक अंकित गोयल, अपर पोलीस अधीक्षक  मनिष कलवानिया, अपर पोलीस अधीक्षक, समीर शेख, अपर पोलीस अधीक्षक सोमय मुंडे, अहेरी, उपविभागीय पोलीस अधिकारी भाऊसाहेब ढोले यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

नक्षल्यांनी पुरून ठेवेलेले मोठी रोख रक्कम व स्फोटके हस्तगत केल्यामुळे या भागात नक्षलवादयांना मोठा हादरा बसलेला आहे. त्यामुळे नक्षल्यांचे लक्षात आलेले आहे की गडचिरोली पोलीस दलाची नजर नक्षल्यांवर असुन, सामान्य नागरीकांकडुन खंडणी वसुल करणे नक्षलयादयांना आता अडचणीचे ठरणार आहे.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

सदर कामगिरीबद्दल पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांनी अभियानात सहभागी असलेल्या विशेष अभियान पथकाचे कौतुक केले आहे. तसेच सदर परीसरात नक्षलविरोधी अभियान तीव्र करण्याचे संकेत दिले आहे.

हे देखील वाचा :

पंढरपूर येथे आषाढीवारी करीता गडचिरोली जिल्ह्यातून बस फेऱ्या नाहीत; जिल्हाधिकारी यांचे आदेश

‘कोरोना’ संकट काळातील पोलिसांची कामगिरी उल्लेखनीय – उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे गौरवोद्गार

कोरोनामूळे मृत आरोग्य सेवकाच्या कुटूंबाला मिळाले विम्याचे ५० लक्ष!

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.