Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

मेडिकल दुकानाचे कुलूप तोडून चोरट्यानी ४० हजाराचा ऐवज केला लंपास

डोंबिवली मध्ये दुसरी घटना, सहा हजाराच्या डेरी मिल्क च्या कॅडबरी, बॉडी स्प्रे आणि कॉस्मेटिकची चोरी

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

मुंबई डेस्क : डोंबिवली शहरात दुकान फोडण्याच्या घटनांमध्ये वाढ होत असून पुन्हा एकदा मेडिकल दुकान फोडून जवळपास ४०  हजाराचा ऐवज लंपास केला आहे. वाढत्या घटनांमुळे व्यापाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

डोंबिवली शहरात काही दिवसांपूर्वी पोलीस चौकी समोरील मेडिकल चे शटर वाकवून चोरी झाली होती ही घटना ताजी असतानाच आज त्या दुकानाच्या ३०० मीटर अंतरावर एक मेडिकल मध्ये चोरी करून दहशत निर्माण केली आहे. डोंबिवली मधील गांधी नगर परिसरातील एस के मेडिकल चे कुलूप तोडून दुकानातील रोकड आणि सामान असा ४० हजाराचा ऐवज लंपास केला.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

एस. के. मेडिकल चे संचालक सतीश कदम यांनी दिलेल्या माहितीनुसार ४ तारखेच्या पहाटे अंदाजे २ वाजताच्या सुमारास चोरट्यानी दुकानाचे दोन्हीं कुलुप कापून दुकानात प्रवेश केला. दुकानातील कॅडबरी, कॉस्मेटिक्स, इन्व्हर्टर आणि कॅश असा जवळपास ४० हजाराचा ऐवज लंपास केला. या बाबत मानपाडा पोलिस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हे देखील वाचा :

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

तब्बल ३५ लांखांचा गुटखा जप्त करण्यात पोलिसांनी मिळाले यश

MPSC उत्तीर्ण, पण दीड वर्षांपासून नोकरी नाही; … या नैराश्यातून विद्यार्थ्याने उचललं टोकाचं पाऊल!

 

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.