Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

MPSC उत्तीर्ण, पण दीड वर्षांपासून नोकरी नाही; … या नैराश्यातून विद्यार्थ्याने उचललं टोकाचं पाऊल!

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क 

पुणे : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) परिक्षेत उत्तीर्ण होऊनही अद्याप नोकरी नसल्याच्या तणावातुन व आर्थिक परिस्थितीमुळे एका विद्यार्थ्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.

ही घटना पुण्यातील फुरसुंगी जवळील गंगानगर येथे घडली. स्वप्निल लोणकर (२४) असं या आत्महत्या करणाऱ्या तरुणाचे नाव आहे. पुण्यातील फुरसुंगी परिसरात राहणाऱ्या या तरुणाने राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या  केली. स्वप्निलला मोठं अधिकारी व्हायचे होते. त्यासाठी त्याने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा  दिली होती. या परीक्षेत तो चांगल्या मार्क्सनी उत्तीर्ण देखील झाला होता. पण त्याला नोकरी मिळाली नाही. यामुळे नैराश्येत येऊन स्वप्निलने आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलले.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

स्वप्निल लोणकर फुरसुंगीमध्ये आपल्या आई-वडील आणि बहिणीसोबत राहत होता. शनिवार पेठेमध्ये  स्वप्निलच्या वडिलांची प्रिंटींग प्रेस आहे. याठिकाणी स्वप्निलचे आई-वडील दोघेही काम करतात. नेहमीप्रमाणे दोघेही प्रिंटींग प्रेसमध्ये कामाला निघून गेले. स्वप्निल आणि त्याची बहीण दोघेच घरी होते. दुपारच्या सुमारास स्वप्निलची बहीण काही कामानिमित्त बाहेर गेली. बाहेरुन आल्यानंतर तिने घरात पाहिले तर स्वप्निल कुठेच नव्हता. त्यानंतर तिने त्याच्या खोलीत जाऊन पाहिले असता स्वप्निलने गळफास लावून आत्महत्या केल्याचे तिला दिसले.

स्वप्निलच्या बहिणीने तात्काळ आई-वडिलांना याबद्दल सांगितले. ते स्वप्निलला हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले पण डॉक्टरांनी त्याला मृत घोषीत केले. पोलिसांना घटनास्थळी स्वप्निलची सुसाईड नोट  सापडली. यामध्ये त्याने आत्महत्या करण्यामागचे कारण सांगितले. ‘मी घाबरलो नाही, खचलो नाही फक्त मी कमी पडलो. माझ्याकडे वेळ नव्हता. एमपीएससी मायाजाळ आहे त्यामध्ये पडू नका.’, असे त्याने या सुसाईड नोटमध्ये लिहिले आहे. माझ्या आत्महत्येला कोणतीही व्यक्ती कारणीभूत नसून माझा हा सर्वस्वी निर्णय असल्याचे त्याने म्हटले आहे.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

स्वप्निल स्थापत्य अभियांत्रिकी (Civil Engineer) पदवी प्राप्त केली होती. त्याने मेहनत करत एमपीएससी परीक्षा दिली. त्यामध्ये तो उत्तीर्ण देखील झाला. पण कोरोनाच्या निर्बंधामुळे त्याची मुलाखत दीड वर्षांपासून झाली नव्हती. घरची परिस्थिती आणि कुटुंबावर असलेले कर्जाचे डोंगर त्यात नोकरी मिळत नसल्यामुळे स्वप्निल चिंतेत होता. या सगळ्या तणावातूनच त्याने आत्महत्या केल्याचे मृत्युपुर्वी चिठ्ठीत लिहून ठेवले आहे.

हे देखील वाचा : 

चिंचाळा येथील नालीचे निकृष्ट बांधकामाची उच्चस्तरीय चौकशी करून बांधकाम व्यवस्थित करण्याची उलगुलान संघटनेची मागणी

इराणी टॅल्कम पावडरच्या कंटेनर मध्ये आढळलेले २९० किलो हेरॉईन अमली पदार्थ कस्टम विभागाने केले जप्त

अबब… कारच्या डिकीत ७० किलो गांजा

 

Comments are closed.