Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

महेंद्रसिंह धोनी करणार सेंद्रीय शेती.

Get real time updates directly on you device, subscribe now.

कुक्कुटपालनाकडे वळला आहे धोनी.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

मुंबई डेस्क १२ नोव्हें :- १५ ऑगस्ट २०१९ मध्ये धोनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त झाल्यानंतर सेंद्रीय शेतीकडे वळला आहे. जुलै २०२० मध्ये धोनीचे ४३ एकर शेतीत शेती करतानाचे फोटो देखील व्हायरल झाले होते.तीन महिन्यांपूर्वी धोनीचे शेती सांभाळणारे मॅनेजर कृषी विकास केंद्र आणि एमपी केदारनाथ मोबाईल ऍप द्वारे संपर्कात आले.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त झाल्यानंतर आता महेंद्रसिंह धोनी कडकनाथ कोंबड्यांची विक्री करेल.धोनीने मध्य प्रदेशातील झाबुआच्या कडकनाथच्या २ हजार पिल्लांसाठी अग्रिम मोबदल्यासोबत झाबुआच्या आदिवासी शेतकऱ्याला ऑर्डरही दिली आहे. पाच दिवसांपूर्वी त्यांनी २ हजार कडकनाथ कोंबड्यांची ऑर्डर केली. धोनीला कोंबड्यांची डिलिव्हरी करण्यासाठी विनोद अतिशय उत्साही आहे.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

त्याचप्रमाणे धोनीची टीम आता डेअरी क्षेत्रातही उतरली आहे. सहीवाल जातीच्या गाई धोनी टीमने विकत घेतल्या आहेत. तसेच मत्सोद्योगात, बदक पालन आणि पोल्ट्री फार्ममध्ये देखील धोनीने गुंतवणूक केली आहे.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.