Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

अहेरी शहरातील प्रमुख रस्तावरील खड्डे तातडीने बुजवा; कार्यकारी अभियंता यांच्याकडे भाजयुमो जिल्हा महामंत्री अमोल गुडेल्लीवार यांची मागणी

कार्यकारी अभियंता अतुल मेश्राम यांनी दिला सकारात्मक प्रतिसाद, अहेरी शहरातील खड्डे लवकरच बुजविण्याचे दिले आश्वासन.

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क 

अहेरी, दि. २९ जुलै : अहेरी शहरात सध्या पावसाळ्याची सुरुवात होताच प्रमुख रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर खड्डे पडल्याने शहरातील जनतेला तसेच वाहनधारकांना कमालीचा त्रास होत आहे. या खड्डामुळे मोठे अपघात होण्याची शक्यता आहे.

याबाबत जनतेच्या अनेक तक्रारी आल्यावर याची त्वरित दखल घेत भाजपा युवा मोर्चाचे जिल्हा महामंत्री अमोल गुडेल्लीवार यांनी सार्वजनिक बांधकाम विभाग आलापल्लीचे कार्यकारी अभियंता (E.E.) अतुल मेश्राम साहेब यांची काल भेट घेतली.  त्यांना यावेळी निवेदन देऊन अहेरी शहरातील प्रमुख रस्तावरील खड्डे तातडीने बुजविण्याची त्यांच्याकडे मागणी केली.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

अहेरी शहरातील आलापल्ली मार्ग, महागाव मार्ग, देवलमरी मार्ग, खमनचेरु मार्ग तसेच वांगेपल्ली गुडेम पोचमार्ग अशा प्रमुख मार्गावर सध्या मोठ्या प्रमाणावर खड्डे झाल्याने सध्या नागरिकांना प्रचंड मनस्ताप होत आहे.  त्यामुळे लवकरात लवकर आपल्या विभागाकडून हे खड्डे बुजविण्याची मागणी यावेळी अमोल गुडेल्लीवार यांनी या निवेदनातुन केली.

या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देत कार्यकारी अभियंता अतुल मेश्राम साहेब यांनी संबंधित विभागाला याबाबत त्वरित सूचना दिल्या तसेच येत्या २ ते ३ दिवसात शक्य तितके खड्डे बुजविण्याचे काम सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे करण्याचे आश्वासन यावेळी त्यांनी दिले. त्यामुळे अहेरी शहरातील खड्यांची समस्या लवकरच सुटण्याची शक्यता आहे.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

हे देखील वाचा :

सुरजागड मार्गावर नक्षल्यांनी झाड पाडून मार्ग केला बंद; नक्षली पत्रके आढळली

टोकियो ऑलिंपिक्स २०२०: भारताची हॉकी, तिरंदाजी, बॉक्सिंग, बॅडमिंटन मध्ये उत्साहवर्धक कामगिरी,पदकाच्या आशा वाढल्या

भामरागड- लाहेरी मार्गावर आढळले नक्षली पत्रके व बॅनर, नक्षल सप्ताह पाळण्याचे केले आवाहन

विषारी सापाशी खेळणे आले अंगलट; युवकाने गमावले प्राण

 

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.