Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

सुरजागड मार्गावर नक्षल्यांनी झाड पाडून मार्ग केला बंद; नक्षली पत्रके आढळली

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

अहेरी, दि. २९ जुलै : सुरजागड मार्गावर नक्षल्यांनी झाड पाडून मार्ग बंद केला आहे तसेच नक्षली पत्रके सुद्धा टाकली आहेत. दरवर्षी नक्षल २८ जुलै ते ३ ऑगस्ट दरम्यान नक्षल सप्ताह पाळण्याचे आवाहन नागरिकांना करतात.

“खोब्रामेंढा अमर शहीदो को लाल सलाम कमरेड्स भास्कर उर्फ पवन, सुखदेव, अस्मिता, अमर सुजाता अमर रहे, अमर शहीदो को अशय को पूरा करेंगे, भारत देश मे नवजनवादी क्रांती को सफल करेंगे.” – भामरागड एरिया कमिटी, सीपीआय (माओवादी) असा मजकुर नक्षली पत्रकातून करण्यात आला आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

दरम्यान काल पोलीस स्टेशन भामरागड पासून अवघ्या ५०० मीटर अंतरावर भामरागड-लाहेरी मार्गावर नक्षली पत्रके व बॅनर आढळले. २८ जुलै ते ३ ऑगस्ट २०२१ पर्यंत शहीद स्मुर्ती सप्ताह पाळण्याचे आवाहन नक्षल्यांनी पत्रकातून व बॅनर मधून केले आहे.

दरवर्षी नक्षल २८ जुलै ते ३ ऑगस्ट पर्यंत पार्टी संस्थापक काँ. चारू मजुमदार, काँ. कान्हाई चॅटर्जी यांना यांच्या स्मुर्तीप्रित्यर्थ नक्षल सप्ताह पार पाडत असतात. त्याच अनुषंगाने यंदाही नक्षल्यांनी २८ जुलै ते 3 ऑगस्ट दरम्यान नक्षल सप्ताह पाळण्याचे आवाहन बॅनर व पत्रकातून नक्षल्यांनी केले आहे.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

२५ जुलै २०२१ रोजी कुरखेडा उपविभागा अंतर्गत येत असलेल्या पोलीस स्टेशन पुराडा हद्दीमध्ये लवारी जंगल परिसरात नक्षलविरोधी अभियान राबवित असताना नक्षल्यांनी गोपनीयरित्या जंगल परिसरात लपवून ठेवलेला शस्त्र व स्फोटकांचा साठा शोधून काढण्यात गडचिरोली जवानांना यश आले आहे.

हे देखील वाचा :

नक्षल्यांनी पुकारलेल्या बंदला कोरचीत १०० टक्के प्रतिसाद

नक्षल्यांनी बॅनर बांधून पैड़ी चकमकीत ठार झालेल्या नक्षल्यांना वाहीली श्रद्धांजली

भामरागड- लाहेरी मार्गावर आढळले नक्षली पत्रके व बॅनर, नक्षल सप्ताह पाळण्याचे केले आवाहन

उर्मिला मातोंडकरानी महाड पुरग्रस्त भागात जाणल्या महिलांच्या व्यथा

 

Comments are closed.