Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

नक्षल्यांनी बॅनर बांधून पैड़ी चकमकीत ठार झालेल्या नक्षल्यांना वाहीली श्रद्धांजली

सुरजागड मार्गावरील भांडारकर नाल्याच्या पुलावर आढळले नक्षली बॅनर.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क 

एटापल्ली, दि. २८ जुलै :  येथून एक किलोमीटर अंतरावर सुरजागड मार्गावरील भांडारकर नाल्याच्या पुलावर नक्षल्यांनी बॅनर बांधून पैड़ी गांव जंगल परिसरात पोलीस-नक्षल चकमकीत ठार झालेल्या तेरा नक्षल्यांना श्रद्धांजली वाहीली आहे.

काही दिवसा पहिल्या नक्षल्यांनी मंगेर-हेडरी पहाडी परिसरात सुरजागड लोह खाणीबाबत नक्षल पत्रक टाकून सुरजागड लोहखनिज उत्खनन करणाऱ्या त्रिवेणी कंपनीच्या अधिकाऱ्यासह एटापल्ली येथील राजकीय नेते,  व्यावसायिक व आलापल्ली येथील वैद्यकीय व्यावसायिकांना निर्वाणीचा इशारा दिला होता. त्यापासून सावध राहण्याचा नागरिकांना ईशारा दिला होता.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

चोवीस तास वर्दळ असलेल्या एटापल्ली-सुरजागड रस्त्यावर २६ जुलैच्या रात्री सात वाजताच्या सुमारास नक्षल्यांनी नाल्यावरील कठडयाला बॅनर बांधून पैड़ी गांव जंगल परिसरात पोलिसांकडून मारल्या गेलेल्या शहीद सतीश, गुनी, रूपेश, उमेश, सुनीता, नंदिनी अमर रहे, असे घोष वाक्य मजकुरात लिहिले आहे. यामुळे खळबळ निर्माण झाली आहे.

दरवर्षी नक्षल २८ जुलै ते ३ ऑगस्ट पर्यंत पार्टी संस्थापक काँ. चारू मजुमदार, काँ. कान्हाई चॅटर्जी यांना यांच्या स्मुर्तीप्रित्यर्थ नक्षल सप्ताह पार पाडत असतात. त्याच अनुषंगाने यंदाही नक्षल्यांनी २८ जुलै ते 3 ऑगस्ट दरम्यान नक्षल सप्ताह पाळण्याचे आवाहन बॅनर व पत्रकातून नक्षल्यांनी केले आहे. त्यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

हे देखील वाचा :

भामरागड- लाहेरी मार्गावर आढळले नक्षली पत्रके व बॅनर, नक्षल सप्ताह पाळण्याचे केले आवाहन

शहीद जवान निलेश महाजन यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; कुटुंबियाचे अश्रू अनावर

Exclusive News : प्रसूतीच्या कळा अन् १५ किलोमीटरची पायपीट….

 

Comments are closed.