Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

शहीद जवान निलेश महाजन यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; कुटुंबियाचे अश्रू अनावर

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

मणिपूर येथे धुळ्यातील शहीद जवान निलेश महाजन यांना गोळी लागून शहीद झाल्यानंतर त्यांचा मृतदेह धुळ्यात आणताच कुटुंबियांचा अश्रूंचा बांध फुटला.

धुळे, दि. २८ जुलै : मणिपूर राज्यातील विष्णुनगर येथे निलेश महाजन हे कर्तव्य बजावत असतांंना दि. ६ नोव्हेंबर २०२० रोजी गोळी लागून गंभीर जखमी झाले होते.  त्यांना सहकाऱ्यांच्या मदतीने गुवाहाटी येथे दाखल करून उपचार सुरू करण्यात आले होते. गेल्या आठ ते नऊ महिन्यांपासून निलेश महाजन यांनी मृत्यूशी झुंज देत शनिवार २४ जुलै रोजी रात्री आठ वाजता त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

जवान निलेश महाजन यांचा तीन दिवसांपूर्वी उपचारादरम्यान मृत्यू झाला होता. परंतु काही तांत्रिक अडचणीमुळे शहीद जवानाचा मृतदेह धुळ्यात आणण्यास विलंब झाला. परंतु आज शहीद जवानाचा मृतदेह धुळ्यातील सोनगीर येथे आणण्यात आला.
शहीद जवान निलेश महाजन यांचा मृतदेह सोनगीर येथे आणताच कुटुंबियांचा व प्रियजनांचा अश्रूंचा बांध फुटला.

नंदुरबार जिल्ह्यातील शहादा तालुक्यातील कळंबू येथील मूळचे रहिवासी असणारे आणि सध्या सोनगीर येथे वास्तव्यास असणाऱ्या निलेश महाजन हे मणिपूर राज्यातील विष्णुनगर येथे कर्तव्य बजावत असताना त्यांना गोळी लागली होती. गेल्या सात ते आठ महिन्यांपासून त्यांच्यावर गुवाहटी येथे उपचार सुरू होते. मात्र अखेर गेल्या तीन दिवसांपूर्वी त्यांची मृत्यूशी झुंज संपली असून ते शहीद झाले आहेत.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

शाहिद नीलेश महाजन यांच्या पार्थिवावर मंगळवारी अंत्यसंस्कार करण्यात येणार होते मात्र काही प्रशासकीय तांत्रिक अडचणीमुळे त्यांचे पार्थिव आज सोनगीर येथे आणण्यात आले. शहिद जवानाच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

हे देखील वाचा :

Exclusive News : प्रसूतीच्या कळा अन् १५ किलोमीटरची पायपीट….

मोठी बातमी : तब्बल ३ कोटी ५० लाखांची रोकड जप्त करण्यात अमरावती पोलिसांना यश

धक्कादायक! शालेय पोषण आहाराच्या तांदळात प्लॅस्टिकयुक्त तांदूळाचे मिश्रण

 

Comments are closed.