Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

धक्कादायक! शालेय पोषण आहाराच्या तांदळात प्लॅस्टिकयुक्त तांदूळाचे मिश्रण

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

नांदेड : जिल्ह्यातील कोसमेट येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत शालेय पोषण आहार योजनेच्या तांदळात प्लास्टिक युक्त तांदळाचे मिश्रण असल्याचे समोर आल्यामुळे खळबळ उडाली आहे. राज्यशासनाच्या माध्यमातून पहिली ते आठवी च्या विध्यार्थ्यांना या तांदुळाचे वाटप करण्यात येते.

26 जुलै 2021 रोजी कोसमेट येथील पालक अनिल शिरफुले यांनी त्यांच्या मुलाला शाळेत दिलेले तांदूळ बारकाईने तपासले असता, तांदळातील फरक लक्षात आला, त्यांनी तात्काळ शाळा प्रशासनाकडे तक्रार केली.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

विषयाचे गंभीर्य लक्षात घेऊन वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष घातले असून तपासणीसाठी चौकशी पथक नेमण्यात आले आहे. या भागाचे जिल्हा परिषद सदस्य सूर्यकांत आरंडकर यांनी चौकशीची मागणी केली आहे. विध्यार्थ्यांच्या जीवाशी खेळण्याचा हा प्रकार असून हे धान्य ज्या एजन्सीमार्फत पुरवण्यात येते त्याची सखोल चौकशी करून कडक कार्यवाहीची मागणी पालकांकडून होत आहे.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

हे देखील वाचा :

अंत्ययात्रा काढून ‘या’ प्राणीप्रेमी शेतकऱ्याने कोंबड्याला दिला अखेरचा निरोप…

ग्रामपंचायत आलापल्लीच्या ग्राम सदस्याचा सरपंचासह प्रशासनाच्या विरोधात एल्गार!

आकाशवाणी केंद्रावर थेट मुलाखतीकरिता ‘शाळेबाहेरची शाळा’ या उपक्रमा अंतर्गत कु. हर्षदा गोंगले विद्यार्थिनीची निवड

Comments are closed.