Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

Exclusive News : प्रसूतीच्या कळा अन् १५ किलोमीटरची पायपीट….

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

पुणे डेस्क, दि. २८ जुलै : भोर तालुक्यातील पश्चिम भागातील हिर्डोशी खोऱ्यात सध्या मुसळधार पाऊस पडत असल्याने या भागात असलेल्या रस्त्यावर दरडी पडल्याने येथील बऱ्याच गावांना जाणारा रस्ता बंद होऊन तेथील गावांचा संपर्क तुटला आहे.

त्यामुळे त्यांना नाना यातना सहन कराव्या लागत आहेत. त्यातच नीरा देवघर धरण रिंगरोडवरील भोर पासून ४० किमी अंतर असलेल्या कुढली येथील प्रसुती कळा सुरु झालेल्या महिलेस दवाखान्यात नेण्यासाठी तेथील ग्रामस्थांना खूप मेहनत घेत गावांचा वापर करत पायपीट करावी लागली.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

कुढलीवरून भोरला येणाऱ्या रस्त्यावर जागोजागी दरडी पडल्याने वाहतुकीसाठी रस्ता बंद करण्यात आला आहे. त्यामुळे त्या महिलेस डालातून जोरदार पावसात जवळजवळ १५ किमी पायी आणले.

त्या प्रसुती कळा असलेल्याची माहिती मिळताच आंबवडे आरोग्य उपकेंद्र तर्फे समुदाय वैद्यकीय अधिकारी खांडेकर, आरोग्य सेविका अर्चना रजपूत या आपल्या सहकार्याने बरोबर कंकवाडीपर्यंत रुग्णवाहिका घेऊन तातडीने दाखल झाल्या.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

तेथुन पुढे दरडीमुळे गाडी जात नसल्याने पायी रस्त्यावर मोठी दरड आली जिथपर्यंत पोहचल्या. आशा सेविका मुक्ता पोळ, वाहन चालक- दिलीप देवघरे, पुरुष परिचार सुरेश दिघेसह पोहचल्या.

तेथे प्रसुती कळा आलेल्या महिलेस ग्रामस्थांनी डालात आणल्यावर आरोग्य सेविका रजपुत यांनी तपासणी केले व पेशंटला भोर येथे नेण्याचे ठरवले. तिथून एका खाजगी गाडीने कंकवाडीपर्यंत आलेल्या रुग्णवाहिकेतून भोर येथील खाजगी रुग्णालयात भरती करण्यात आले.

काही वेळाने प्रसूती झाली, बाळ व माता सुखरूप आहेत. एवढ्या पाऊसातही देवदुताप्रमाणे काम केल्याने आरोग्य खात्याच्या या आरोग्य सेविकेचे, वाहनचालक, पुरुष परिचर, आशा सेविका व ग्रामस्थांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

हे देखील वाचा :

मोठी बातमी : तब्बल ३ कोटी ५० लाखांची रोकड जप्त करण्यात अमरावती पोलिसांना यश

धक्कादायक! शालेय पोषण आहाराच्या तांदळात प्लॅस्टिकयुक्त तांदूळाचे मिश्रण

वनपरिक्षेत्र अधिकारी, सहाय्यक वनसंरक्षक व विभागीय वनाधिकारी यांच्या मलाईदार पोस्टिंगसाठी मंत्रालयात लॉबिंग; वनराज्यमंत्राच्या शिफारस पत्रांचा सीएमओत खच!

 

Comments are closed.