Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

भामरागड- लाहेरी मार्गावर आढळले नक्षली पत्रके व बॅनर, नक्षल सप्ताह पाळण्याचे केले आवाहन

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

भामरागड : पोलीस स्टेशन भामरागड पासून अवघ्या ५०० मीटर अंतरावर भामरागड-लाहेरी मार्गावर नक्षली पत्रके व बॅनर आढळले आहेत. २८ जुलै ते ३ ऑगस्ट २०२१ पर्यंत शहीद स्मुर्ती सप्ताह पाळण्याचे आवाहन नक्षल्यांनी पत्रकातून व बॅनर मधून केले आहे.

दरवर्षी नक्षल २८ जुलै ते ३ ऑगस्ट पर्यंत पार्टी संस्थापक काँ. चारू मजुमदार, काँ. कान्हाई चॅटर्जी यांना यांच्या स्मुर्तीप्रित्यर्थ नक्षल सप्ताह पार पाडत असतात. त्याच अनुषंगाने यंदाही नक्षल्यांनी २८ जुलै ते 3 ऑगस्ट दरम्यान नक्षल सप्ताह पाळण्याचे आवाहन बॅनर व पत्रकातून नक्षल्यांनी केले आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

दरम्यान २५ जुलै २०२१ रोजी कुरखेडा उपविभागा अंतर्गत येत असलेल्या पोलीस स्टेशन पुराडा हद्दीमध्ये लवारी जंगल परिसरात नक्षलविरोधी अभियान राबवित असताना नक्षल्यांनी गोपनीयरित्या जंगल परिसरात लपवून ठेवलेला शस्त्र व स्फोटकांचा साठा शोधून काढण्यात गडचिरोली ज वानांना यश आले आहे.

हे देखील वाचा :

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

शहीद जवान निलेश महाजन यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; कुटुंबियाचे अश्रू अनावर

Exclusive News : प्रसूतीच्या कळा अन् १५ किलोमीटरची पायपीट….

मोठी बातमी : तब्बल ३ कोटी ५० लाखांची रोकड जप्त करण्यात अमरावती पोलिसांना यश

 

 

Comments are closed.