Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

विहिरीत पडलेल्या वाघाला बाहेर काढण्यात वन विभागाला यश

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क ; 

चंद्रपूर ०८ नोव्हेंबर:  वरोरा तालुक्यातील असलेल्या वरोरा वनपरिक्षेत्रा अंतर्गत शेगाव उपक्षेत्रात येणाऱ्या साखरा नियतक्षेत्रातील  मोखाळा सर्व्हे क्र. १०० येथील महादेव शिवा शिरपाते रा. अल्फार यांच्या शेताशिवारातील विहिरीमध्ये पट्टेदार वाघ पडून असल्याचे दिसून येताच शेतकऱ्याने भयभीत होऊन सदर घटनेची माहिती गावकऱ्यांसह वनविभागालाही देण्यात आली. त्यावेळी वाघाला पाहण्यासाठी मोखाळा  गावातील नागरिकांनी एकच गर्दी निर्माण केली होती. त्यावेळी स्थानिकांकडून शिकारीचा पाठलाग करतांना वाघ विहिरीत पडला असल्याची शक्यता वर्तविण्यात आली.

महादेव शिवा शिरपाते यांच्या मालकीच्या शेतशिवारातील विहीरीला उंच कठगडा नसल्याने सदर वाघ शिकारी दरम्यान विहिरीत पडला असावा. त्याच दरम्यान भयभीत होवून बाहेर निघण्यासाठी प्रयत्न करीत असतांना विहीरीतिल पाणी काढण्यासाठी वापरण्यात येणारे बालटीचा दोर विहिरीत पडून असल्याने दोर वाघाभोवती गुंडाळल्याचे दृष्य नजरेस आले.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

दरम्यान सदर घटनेची माहिती शेतकऱ्याने वन विभागाला दिली असल्याने वनविभागाची बचाव चमू घटनास्थळी दाखल झाली. सर्वप्रथम घटनास्थळावर असलेल्या जमावावर वनविभाग कर्मचारी व शेगाव पोलीस यांचे द्वारे नियंत्रित करण्यात आले.

मुख्य वनसंरक्षक चंद्रपूर एन. आर. प्रवीण व उपवनसंरक्षक चंद्रपूर मनोत्रा, विभागीय वन अधिकारी (अतिरिक्त कार्यभार) चंद्रपूर तसेच सहाय्यक वनसंरक्षक प्रभारी शेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली व डॉक्टर रविकांत खोब्रागडे पशुवैद्यकीय अधिकारी वन्यजीव ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प तथा आर. आर. टी. ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प चंद्रपूर यांनी सुचविल्याप्रमाणे वाघास आत्मविश्वास व संतुलन येण्यासाठी लाकडी खाट विहिरीत दोरखंडाच्या सहाय्याने सोडण्यात आली. अमोल ए. नेवारे (वनरक्षक),  के. बी. देऊळकर (क्षेत्र सहायक शेगाव), एम. एन. निबुद्धे (वनपाल वरोरा), आय. डब्ल्यू. लडके (वनरक्षक), एस. डी. वाटेकर (वनरक्षक), विशाल मोरे (NGO अपास वरोरा)  या सर्वांच्या मदतीने खाट चारही बाजूने दोरखंडाच्या सहाय्याने घट्ट बांधून विहिरीमध्ये सोडण्यात आली. त्यामुळे वाघास खाटेवर स्थिर बसता आले व घटनास्थळावरील जमावास घटनास्थळापासून दूर करून खाट काही अंतरावर वर उचलण्यात आली व वाघ बाहेर निघण्यास मदत झाली. लगेच सदर वाघ स्वतः उडी मारून जंगलाच्या दिशेने निघून गेला व तो सुदृढ असल्याचे पशुवैद्यकीय अधिकारी यांनी सांगितले.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

सदर घटनास्थळी एम. पी. राठोड, वनपरिक्षेत्र अधिकारी, डॉक्टर रविकांत खोब्रागडे, पशुवैद्यकीय अधिकारी वन्यजीव ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प व RRT टीम चंद्रपूर, RRU टीम चंद्रपूर, बंडू धोत्रे, इको प्रो. टीम चंद्रपुर (NGO तपास वरोरा) व वरोरा परिक्षेत्रातील सर्व क्षेत्र सहाय्यक व वनरक्षक तसेच वनमजूर व गावकरी हजर होते. अशा प्रकारे सर्वांच्या सहकार्याने सदर विहिरीत पडलेला वाघ रेस्क्यू यशस्वीरीत्या पार पाडण्यात आले.

हे देखील वाचा :

सीआरपीएफच्या जवानांचा सहकारी जवानांवर अंधाधुंद गोळीबार, चौघांचा मृत्यू तर तीन जवान गंभीर जखमी

आणखी एका लालपरीच्या वाहतूक नियंत्रकाने संपविले जीवन!

डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्थेकडून (बार्टी) विद्यार्थी दिवस साजरा

 

 

Comments are closed.