Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

“विद्यार्थी दिवसा” निमित्त शैक्षणिक साहित्य वाटप

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क : 

अहेरी दि. ०८ नोव्हेंबर :- जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गडबामणीच्या पटांगणात विद्यार्थी दिवसा निमित्ताने वर्ग १ ते ५ वी पर्यंतच्या विद्यार्थ्याना संविधान जागृकता मंचा अहेरी व भगतसिंग फॅन्स क्लब यांच्या संयुक्त कार्यक्रमातून विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले.

भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी ७ नोव्हेंबर १९०० रोजी सातारा शहरातील राजवाडा चौकात असलेल्या गव्हर्नमेंट हायस्कूल ( आता प्रतापसिंह हायस्कूल ) मध्ये पहिल्या वर्गात प्रवेश केले आणि ईसवी सन १९०४ पर्यंत म्हणजे चौथीपर्यंत शिक्षण पूर्ण केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर जगातील एकमेव विद्यार्थी असल्याने ज्यांच्या शाळेचा पहिला दिवस हा “विद्यार्थी दिवस” म्हणून साजरा करण्यात येतो.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

या कार्यक्रमाच्या सुरुवातीला महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि  स्वातंत्र्यवीर शहीद बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. यावेळी प्रस्ताविक एड. पंकज दहागावकर यांनी म्हटले की, कोरोना काळामध्ये विद्यार्थी व शिक्षण यांच्यात दुरावा निर्माण झाला आहे. हा दुरावा दुर करण्यासाठी विद्यार्थ्याना शिक्षणाचे धडे देऊन शिक्षण घेण्यासाठी प्रोत्साहित करुन विद्यार्थ्यांचे मनोबल  वाढवण्याची अत्यंत गरज आहे. त्यासाठी समाजातील  प्रत्येकाने शिक्षणासाठी आपल्या परिवारासह मुलांना प्रेरित केले पाहिजे.

सदर कार्यक्रमात भगतसिंग फॅन्स क्लबचे अध्यक्ष अश्विन मडावी यांनी संबोधतांना म्हणाले की, आजही आदिवासीं बांधव उच्च शिक्षणापासून वंचित आहे. शिक्षणाशिवाय समाजाची प्रगती होणे शक्य नाही. त्यामुळें गावातील नागरिकांनी आपल्या मुलांना उच्च शिक्षणासाठी सहकार्य करावे. तर या कार्यक्रमात उपस्थित असलेले सामाजिक कार्यकर्ते  दिपक सुनतकर यांनी आपले मत व्यक्त करतांना म्हणाले की, बाबासाहेबांच्या आठवणी प्रित्यर्थ वाटप करण्यात आलेले शैक्षणिक साहित्याचे सदुपयोग करून वाचन तथा लेखन करून उच्च शिक्षित व्हावे तेव्हाच समाजात परिवर्तन दिसून येईल. बाबासाहेबांनी म्हटले आहे की, “वाचाल तर वाचाल” हे वाक्य नेहमी आचरणात आणून उच्च शिक्षित होऊन परिवर्तीत होणे हे काळाची गरज असल्याचे म्हटले आहे.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

यावेळी सामुहीकरित्या भारतीय संविधान प्रास्ताविकेच सामुहीक रित्या वाचन करण्यात आले. कार्यक्रमाचे संचालन व आभार दिपक सुनकर यांनी केले तर कार्यक्रम यशस्वीतेसाठी आशिष सुनतकर, प्रभाकर कुसराम, सुनिल मडावी, दौलत सिडाम,अक्षय आत्राम, सुनील पेंदाम, अशोक नैताम, विकी कोलकान, पवन येदुल, रोशन मडावी, नागेश कोलकान, अनिल नैताम, किशोर पेंदाम, महेश मारिन चिंटू कुसराम यांनी सहकार्य केले. यावेळी गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

हे देखील वाचा,

सीआरपीएफच्या जवानांचा सहकारी जवानांवर अंधाधुंद गोळीबार, चौघांचा मृत्यू तर तीन जवान गंभीर जखमी

विहिरीत पडलेल्या वाघाला बाहेर काढण्यात वन विभागाला यश

आणखी एका लालपरीच्या वाहतूक नियंत्रकाने संपविले जीवन!

 

 

Comments are closed.