Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्थेकडून (बार्टी) विद्यार्थी दिवस साजरा

बार्टीच्या योजने विषयी अधिक माहितीसाठी e-BARTI app चा वापर करावा - मनिष गणवीर, प्रकल्प अधिकारी

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

गडचिरोली, दि. ८ नोव्हेंबर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी) गडचिरोलीच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर अभ्यासिकेत प्रकल्प अधिकारी मनिष गणवीर यांच्या प्रमुख उपस्थितीत विद्यार्थी दिवस साजरा करण्यात आला.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मरणार्थ विध्यार्थी दिन ७ नोव्हेंबर रोजी संपूर्ण महाराष्ट्रात साजरा केला जातो. महाराष्ट्र शासनाच्या शिक्षण विभागाने ७ नोव्हेंबर हा दिवस विद्यार्थी दिन म्हणून राज्यभर साजरा करण्याचे निर्णय २७ ऑक्टोंबर २०१७ रोजी घेण्यात आला. अति उच्च दर्जाची विद्वत्ता व ज्ञान असतानाही आंबेडकरांनी स्वतःला आजन्म विद्यार्थी मानले  आणि ते आदर्श विद्यार्थी ठरले यामुळे शासनाने त्यांच्या शाळा प्रवेश दिनाला विद्यार्थी दिन म्हणून घोषित केले.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

कार्यक्रमाची सुरुवात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस माल्यार्पण व अभिवादन करून  करण्यात आली. कार्यक्रमात बार्टीच्या पोलीस भरती पूर्व प्रशिक्षण, आयबीपीएस प्रशिक्षण, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर विशेष अनुदान योजना व e-BARTI app या विषयी माहिती देण्यात आली. तसेच अभ्यासिकेला भारतीय संविधान व बार्टी प्रकाशित पुस्तक संच देण्यात आला.

 

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

यावेळी अभ्यासिका संचालक देवेंद्र मेश्राम, राजू मेश्राम व अभ्यासिका येथील विद्यार्थी उपस्थित  होते.

 

 

 

 

हे देखील वाचा :

सीआरपीएफच्या जवानांचा सहकारी जवानांवर अंधाधुंद गोळीबार, चौघांचा मृत्यू तर तीन जवान गंभीर जखमी

 

Comments are closed.