Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

सीआरपीएफच्या जवानांचा सहकारी जवानांवर अंधाधुंद गोळीबार, चौघांचा मृत्यू तर तीन जवान गंभीर जखमी

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

छत्तीसगड, 0नोव्हेंबर: सुकमा जिल्ह्यातील मराईगुडा येथील लिंगानापल्ली कॅम्पमध्ये सीआरपीएफ जवानाने आपल्याच साथीदारांवर अंधाधुंद गोळीबार केल्याची घटना घडली आहे.

या घटनेत चार जवानांचा जागीच मृत्यू झाला तर तीन जवान गंभीररित्या जखमी झाले आहे. जखमी जवानांना स्थानिक रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असून इतर गंभीर असलेल्या जवानांना तेलंगाना येथील भद्राचलम रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. जवानाने आपल्याच कॅम्पवर गोळीबार का केला? याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती मिळालेली नाही. सीआरपीएफकडून या घटनेचा तपास केला जात आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

प्राप्त माहितीनुसार मरईगुडा पोलीस ठाण्याच्या क्षेत्रात असलेल्या लिंगानापल्ली सीआरपीएफ ५० बटालियन कॅम्पमध्ये ही घटना घडली. मध्यरात्रीच्या ३.२५  वाजताच्या सुमारास जवानांमध्ये वाद निर्माण झाला त्या वादाचे रुपांतर इतके विकोपाला गेले की, थेट रितेश रंजन या जवानानं आपल्या सहकारी जवानांवर गोळीबार केला आहे.

या घटनेत ४ जवानांचा जागीच मृत्यू झाला तर ३ गंभीररित्या जखमी झाले आहे. याशिवाय काही जवान किरकोळ जखमी असल्याची माहिती प्राप्त झाली असून त्या जवानांवर स्थानिक रुग्णालयात उपचार करण्यात येत आहे. तर गंभीर जवानांना तात्काळ भद्राचलम येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

पहाटे साडेतीन वाजण्याच्या सुमारास वाद झाल्यानंतर सीआरपीएफच्या जवानाने आपल्या एके-४७ रायफलने अन्य साथीदारावर गोळीबार केला. यामध्ये चार जवानांचा जागीच मृत्यू झालाय. तीन जणांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. घटनेची माहिती मिळताच, अन्य जवान आणि अधिकारी घटनास्थळावर दाखल झाले. आरोपी जवानाला पकडण्यात आलं आहे. पोलिस आणि सीआरपीएप आरोपी जवानाची चौकशी करत आहेत. 
श्री. सुंदरराज –  आयजीपी,  बस्तर (छत्तीसगड) 

 

 

Comments are closed.