Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

आणखी एका लालपरीच्या वाहतूक नियंत्रकाने संपविले जीवन!

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

ब्रम्हपुरी एसटी आगारातील वाहतूक नियंत्रकाने आत्महत्या केल्याने खळबळ माजली आहे.  सत्यजित ठाकूर असे एसटी कर्मचाऱ्याचे नाव आहे.  ब्रह्मपुरी शहरातील राहत्या भाड्याच्या खोलीत विषप्राशन करून आत्महत्या केल्याचे उघडकीस आले. 

चंद्रपूर,दि.०८ नोव्हेंबर : ब्रम्हपुरी येथील आणखी एका लालपरीच्या वाहतूक नियंत्रकाने विषप्राशन करून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. मृतक कर्मचाऱ्याचे नाव सत्यजित ठाकूर (३४) असे आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

ब्रम्हपुरी प्रमुख आगारामध्ये वाहतूक नियंत्रक म्हणून सत्यजित ठाकूर कार्यरत होते. त्यांचा परिवारात पत्नी व चार महिण्याची मुलगी असून ते नागपूर येथे राहतात. मृतक सत्यजित ठाकूर दोन दिवसापूर्वीच ब्रम्हपुरीला आले होते. पत्नीने फोन केला असता फोन बंद येत असल्याने त्यांनी त्याच्या सहका-यांना फोन केले. सहका-यांनी घरी जाऊन पाहिले असता सत्यजीत ठाकूर यांनी घरी आत्महत्या केल्याची बाब उघडकीस आली आहे. त्याने विषप्राशन करून जीवन संपविल्याची माहिती समोर आली आहे. त्यांच्या आत्महत्येचं नेमकं कारण अद्याप समोर आलेलं नाही.

सत्यजीत ठाकूर हे चार महिन्यापूर्वीच ब्रम्हपुरी आगारात बदलून आले होते. ते मुळचे नागपूर येथील निवासी आहेत. ब्रम्हपुरी पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन उत्तरीय तपासणीला पाठविला आहे. पोलिस तपासाअंती मृत्यूचे कारण स्पष्ट होणार आहे.एस. टी. कर्मचाऱ्यांनी आपल्या मागण्यांसाठी राज्यभर संप पुकारला असतानाच आत्महत्येच्या या घटनेनं कर्मचाऱ्यांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

याआधी अनेक एसटी कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. नुकतीच एका कर्मचाऱ्याने एसटीला गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना ताजी असताना ब्रम्हपुरी मध्ये घडलेल्या या घटनेने एकच खळबळ उडाली आहे.

 

हे देखील वाचा :

सीआरपीएफच्या जवानांचा सहकारी जवानांवर अंधाधुंद गोळीबार, चौघांचा मृत्यू तर तीन जवान गंभीर जखमी

डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्थेकडून (बार्टी) विद्यार्थी दिवस साजरा

 

 

Comments are closed.