Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

मोठी बातमी : दोन युवकांची नक्षलवाद्यांकडून हत्या

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

गडचिरोली, दि. १४ एप्रिल : एटापल्ली तालुक्यातील गट्टा (जा) पोलीस मदत केंद्राअंतर्गत दोन निरपराध युवकांची पोलीस खबऱ्या असल्याच्या संशयावरून नक्षलवाद्यांकडुन निर्घृण हत्या केल्याची घटना आज सकाळी समोर आली आहे.

नक्षलवाद्यांनी हत्या केलेल्या पहिल्या युवकाचे नाव मंगेश मासा हिचामी (२७) रा .झारेवाडा तर दुसऱ्या युवकाचे नाव नविन पेका नरोटे (२५) रा.गोरगुट्टा असे आहे. या दोघांच्याही हत्येनंतर मंगेश हिचामी याचे मृतदेह झारेवाडा ते गट्टा रोडवर आणुन ठेवले तर नविन नरोटे याचे मृतदेह गोरगुट्टा ते गिलनगुडा रोडवर आणुन ठेवले होते. हत्या झालेल्या युवकांमधील नवीन नरोटे  हा आत्मसमर्पित नक्षलवादी होता.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

गडचिरोली जिल्ह्यातील महत्वाकांक्षी असलेल्या लोहखनिज प्रकल्प सुरजागड येथे पालकमंत्र्यांच्या जाहिर कार्यक्रमानंतर नक्षल्यांनी सक्रिय होऊन दोघांची हत्या केल्याची घटना आज उघडकीस आली आहे.

नक्षल्यांनी केलेल्या हत्या मधील युवक मंगेश हिचामी हा झारेवाडा येथील पोलीस खबरी असल्याच्या संशयावरून झाल्याची प्राथमिक माहिती असून दुसरा आत्मसमर्पित नक्षली नवीन उर्फ अशोक पेका नरोटी याची गोरगट्टा येथे दगडाने डोके ठेचून हत्या केल्याची माहिती विश्वसनीय सुत्रांकडून प्राप्त झाली आहे.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

काल दुपारी २ वाजता सुरजागड लोहखनिज टेकड्यांवर पालकमंत्री एकनाथ शिंदे यांचे जाहिर कार्यक्रम झाले. या कार्यक्रमाचा २४ तासांचा कालावधी उलटण्याआधीच नक्षल्यांनी दोघांची हत्या करून आपला उपद्रव माजविल्याने पोलीस प्रशासनात खळबळ उडाली असून नक्षल आजच्या घडीला सुरजागड प्रकरणावरून अधिक सक्रिय झाल्याचे दिसून येत आहे. तसेच जिल्ह्यात सुरजागड वादावरून भयान परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

हे देखील वाचा : 

सिरोंचा येथे पुण्यस्नान करण्यासाठी विविध राज्यांतील भाविकांची पसंती

 

 

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.