Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

देशात “संसदीय लोकशाही पद्धती” कायम ठेवण्याचे काम बाबासाहेबांच्या संविधानामुळेच शक्य” : श्री. शरद पवार

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, 

पुणे, २५ एप्रिल : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधान निर्मितीतील भरीव योगदानाबद्दल कोणाचेही दुमत असणे शक्यच नाही. आज बाबासाहेबांनी लिहिलेल्या संविधानाचे महत्व हे अनन्यसाधारण असे आहे. भारतासारख्या खंडप्राय देशात जेथे विविधता हा केंद्रबिंदू आहे अश्या ठिकाणी “संसदीय लोकशाही पद्धती” कायम ठेवण्याचे काम बाबासाहेबांनी संविधानामार्फत केले आहे असे विधान शरद पवार यांनी केले.

सिंबायोसिस संस्थेचे डॉ. बाबासाहेब आंबेडकर संग्रहालय आणि स्मारक रौप्यमहोत्सवी वर्षात पदार्पण करत आहे. त्या निमित्त सोमवार, दिनांक २५ एप्रिल २०२२ रोजी सकाळी ११ वाजता रौप्यमहोत्सवी समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. या समारंभासाठी प्रमुख अतिथी म्हणून माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार याना आमंत्रित करण्यात आले होते.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

सुनीता परशुराम वाडेकर, मा. उपमहापौर, पुणे, सौ. संजीवनी मुजुमदार, मानद संचालिका, सिंबायोसिस संस्थेचे डॉ. बाबासाहेब आंबेडकर संग्रहालय आणि स्मारक, डॉ. विद्या येरवडेकर, प्रधान संचालिका, सिंबायोसिस आदी इतर मान्यवर या रौप्यमोहत्सवी समारंभासाठी उपस्थित होते.

रौप्यमहोत्सवी समारंभात बोलताना शरद पवार म्हणाले कि, बाबासाहेबानी संविधान निर्मितीतील योगधानाव्यतिरिक्त देश्याच्या दृष्टीने अनेक महत्वाचे निर्णय घेतले होते जसे कि, पंजाब येथे यशस्वीरीत्या राबविण्यात आलेला “भाकरा नांगल प्रकल्प”.राज्याराज्यांमधील अतिरिक्त विजेच्या संदर्भांत घेण्यात आलेला “पॉवर ग्रीड कॉर्पोरेशन” चा निर्णय, मजूर संघाची स्थापना असे अनेक धोरणात्मक निर्णय बाबासाहेबांनी दूरदृष्टी ठेवून देश हितासाठी घेतले.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

गुणवत्तापूर्ण शिक्षण आणि शिक्षणाच्या संदर्भात कधीही न केलेली तडजोड यामुळे सिंबायोसिस संस्थेचा वृक्ष हा जगभरात नावारूपास आल्याचे शरद पवार म्हणाले. दर्जेदार शिक्षण, उत्तम संस्कार समाजातील युकांमध्ये रुजवण्याचे काम डॉ. मुजुमदार व त्यांचे कुटुंबीय सिंबायोसिस च्या माध्यमातून करत आहे. गेल्या २५ वर्षात या ठिकाणी प्रचंड बदल झाला आहे संपूर्ण खडकाळ अश्या या परिसरात वृक्षवल्ली फुलवण्याचे काम सिंबायोसिस ने यशस्वीरीत्या केले आहे असे देखील शरद पवार पुढे बोलताना म्हणाले.

डॉ. शां. ब. मुजुमदार, संस्थापक व अध्यक्ष सिंबायोसिस यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात बोलताना सिंबायोसिस च्या स्मारक व संग्रहालयाच्या निर्मिती चा खडतर प्रवास कथन केला. ते म्हणाले कि, जशी प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्याची एक गोष्ट/ स्टोरी असते तशी एक विशिष्ट स्टोरी वास्तूची देखील असते. त्यांनी सिंबायोसिस च्या स्मारक व संग्रहालयाच्या निर्मितीच्या वेळी झालेला प्रखर विरोध व अडथळ्यांबद्दल बद्दल सांगितले. शरद पवार यांनी त्यावेळी स्मारक व संग्रहालयाच्या पायाभरणीच्या वेळेस ५ लाख रुपये दिल्याचे देखील सांगितले.

सुनीता परशुराम वाडेकर, उपमहापौर यांनी आपल्या भाषणात बोलताना सिंबायोसिस ने बाबासाहेबांची विचारधारा शिक्षणाच्या माध्यमातून पुढे नेण्याचे मोलाचे काम केले असल्याचे सांगितले. आज भारतभर सिंबायोसिस चा झालेला विस्तार पाहता डॉ. मुजुमदार व कुटुंबियांचे कौतुक करावे तेवढे थोडे आहे असे त्या म्हणाल्या व सिंबायोसिस च्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

संजीवनी मुजुमदार, मानद संचालिका, सिंबायोसिस संस्थेचे डॉ. बाबासाहेब आंबेडकर संग्रहालय आणि स्मारक यांनी प्रास्ताविक केले तर डॉ. स्वाती दीक्षित यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.

हे देखील वाचा : 

दिनांक 25 एप्रिल रोजी हिवताप दिन साजरा

राज्यात कायदा, सुव्यवस्था राखण्यासाठी सर्वांनी सहकार्य करा, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आवाहन

जात वैधता प्रमाणपत्र पडताळणी व शिक्षण विभागातील विविध योजनांची माहिती व सुचना देणेबाबत दि. 26 एप्रिल रोजी प्रशिक्षण शिबीराचे आयोजन

 

 

Comments are closed.