Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

वसतिगृहांच्या सोयी-सुविधांसाठी निधी कमी पडू देणार नाही – मंत्री धनंजय मुंडे

कर्जत येथील शासकीय वसतीगृह आणि अनुदानित वसतिगृहाच्या नवीन वसतीगृहांचे उद्घाटन, लोकार्पण व विशेष मोहीमेतील लाभार्थीं यांना लाभ मंजूरी आदेश वाटप

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, 

अहमदनगर, दि. २५ एप्रिल : कर्जत येथील मुलींच्या शासकीय वसतिगृहाची इमारत अतिशय सोयी-सुविधांनी युक्त झाली आहे. पुढील काळात वसतिगृहांच्या दर्जेदार शैक्षणिक सुविधांसाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही.असे प्रतिपादन राज्याचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री धनंजय मुंडे यांनी आज येथे केले.

सामाजिक न्याय विभागाच्या कर्जत येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय व आर्थिकदृष्ट्या मागास मुलींचे शासकीय वसतिगृहाची नवीन इमारत, सिद्धार्थ बोर्डिंग या अनुदानित वसतीगृहाच्या नवीन इमारतीचे उद्घाटन व लोकार्पण तसेच विशेष मोहीमेतील लाभार्थीं यांना लाभ मंजूरी आदेश वाटप सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्या हस्ते आज करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

याप्रसंगी आमदार रोहित पवार, कर्जतच्या नगराध्यक्षा उषा राऊत, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता जयंत कुलकर्णी, कार्यकारी अभियंता संजय पवार, समाजकल्याण नाशिक विभागाचे प्रादेशिक उपायुक्त भगवान वीर, अहमदनगर सहाय्यक आयुक्त राधाकिसन देवढे तसेच स्थानिक लोकप्रतिनिधी व विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते. यावेळी‌ ‘अहमदनगर समाजकल्याण विभागाच्या योजनांची दूरदृष्टता’ या पुस्तिकेचे प्रकाशन ही सामाजिक न्यायमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले.

श्री मुंडे म्हणाले, कर्जत शासकीय वसतिगृहाच्या बांधकामास मंजूर अंदाजपत्रकापेक्षा कमी निधी खर्च झालेला आहे. बचत झालेल्या पैशातून याचं वसतिगृहाच्या पायाभूत सुविधांसाठी निधी खर्च केला जाईल.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

कर्जत येथे तृतीयपंथीयांच्या स्मशानभूमीसाठी जागा उपलब्ध करून देण्यासाठी नगरापंचायतीने प्रस्ताव तयार करावा. सामाजिक न्याय विभागाच्या वतीने सदर प्रस्तावास मंजूरी दिली जाईल. असे आश्वासन ही यावेळी मंत्री धनंजय मुंडे यांनी दिले.

यावेळी शासकीय वसतिगृहाची देखभाल व्यवस्थित ठेवण्याच्या सूचना ही त्यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना दिल्या.

याप्रसंगी अहमदनगर जिल्ह्यातील तृतीयपंथीयांना ओळखपत्र व प्रमाणपत्रांचे धनंजय मुंडे यांच्या हस्ते वाटप करण्यात आले.

सुमारे ९ कोटी रूपये खर्च करून बांधण्यात आलेल्या डॉ.बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय व आर्थिकदृष्ट्या मागास मुलींच्या शासकीय वसतिगृहात १०० मुलींच्या निवास व भोजनाची व्यवस्था होणार आहे. २४६६.४८ चौरस मीटर इतक्या क्षेत्रफळावर तळमजला व पहिला मजला अशी वसतिगृहाची इमारत उभारण्यात आली आहे. सोयी-सुविधांनी युक्त अशा इमारतीत विद्यार्थीनी निवास, भोजन कक्ष, कार्यालय, भांडार कक्ष, संगणक कक्ष, वाचनालय, अधीक्षक निवास अशा २७ खोल्या बांधण्यात आले आहेत. प्रत्येक खोलीत ४ मुलींच्या निवास बेड आहेत. अतिशय सुसज्ज फर्निचर वसतिगृहाच्या खोल्यांमध्ये उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.

हे देखील वाचा : 

राज्यात कायदा, सुव्यवस्था राखण्यासाठी सर्वांनी सहकार्य करा, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आवाहन

जात वैधता प्रमाणपत्र पडताळणी व शिक्षण विभागातील विविध योजनांची माहिती व सुचना देणेबाबत दि. 26 एप्रिल रोजी प्रशिक्षण शिबीराचे आयोजन

 

Comments are closed.