Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

जात वैधता प्रमाणपत्र पडताळणी व शिक्षण विभागातील विविध योजनांची माहिती व सुचना देणेबाबत दि. 26 एप्रिल रोजी प्रशिक्षण शिबीराचे आयोजन

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

गडचिरोली, दि 25 एप्रिल : तालुका स्तरावर इयत्ता 11 वी 12 वी विज्ञान शाखेत तसेच सी. ई.टी,‍नीट,जे.ई.ई. व्दारे व्यावसायीक अभ्यासक्रमात प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना जात वैधता प्रमाणपत्र प्रस्ताव सादर करताना बऱ्याच अडचणी येत असून व बरेची अर्जदार त्रृटीयुक्त प्रकरणे सादर करत असल्याने याबाबत तालुका स्तरावरील जात वैधता प्रमाणपत्राबाबत प्रशिक्षण शिबीर आयोजीत करण्यात येत आहे.

प्रशिक्षण शिबीर स्थळ/महाविद्यालयाचे नाव:- महिला महाविद्यालय, गडचिरोली

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

दिनांक 26.04.2022 वेळ सकाळी 11.00 वाजता गडचिरोली,चामोर्शी व धानोरा या तालुक्यातील ‍ कनिष्ठ महाविद्यालयातील मुख्याध्यापक, लिपीक तसेच अर्जदार व पालक यांनी सदर प्रशिक्षण शिबीराचा लाभ घ्यावा.तसेच सन-2021-22 या सत्रात समितीकडे जात वैधता प्रमाणपत्राचा प्रस्ताव सादर केलेला आहे. परंतु आज पावेतो जात वैधता प्रमाणपत्र प्राप्त झालेले नाही,असे प्रस्ताव त्रृटीमध्ये आहेत. अशा या तीन तालुक्यातील अर्जदारांनी सदर प्रशिक्षण स्थळी सर्व मुळ पुरावे व मानीव दिनांकाचा जात व अधिवास पुराव्यासह उपस्थित राहावे,असे आवाहन उपायुक्त दे.ना. धारगावे यांनी केले आहे.

हे देखील वाचा : 

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

राज्यात कायदा, सुव्यवस्था राखण्यासाठी सर्वांनी सहकार्य करा, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आवाहन

दिनांक 25 एप्रिल रोजी हिवताप दिन साजरा

अज्ञात वाहनाच्या धडकेत मुख्याध्यापकांचा जागीच मृत्यू तर सहकारी शिक्षक गंभीर

धक्कादायक! माजी पालकमंत्री अंब्रिशराव आत्राम यांच्या सुरक्षा रक्षकाची गोळी झाडून आत्महत्या

 

Comments are closed.