Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

आंतरराष्ट्रीय युवा दिनानिमित्त अभिनव ” फेस पेंटिंग “

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

चंद्रपूर  25 ऑगस्ट :-  सिंदेवाही तालुक्यातील नवरगाव एड्सनियंत्रण संस्था चंद्रपूर तर्फे आंतरराष्ट्रीय युवा दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.एड्समुक्त भारत या सामाजिक विषयावर अभिव्यक्त होण्यासाठी व समाज जागृती व्हावी याकरिता महाराष्ट्र राज्य एड्समुक्त भारत करण्यासाठीचा संदेश या विद्यार्थ्यांनी दुसऱ्या विध्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर रंगवून त्याचे प्रदर्शन केले. आणि एड्समुक्त भारत करण्यासाठी आम्ही तरुण सज्ज आहोत हा संदेश या अभिव्यक्तीतून दिला.

यावेळी भारतीय शिक्षण संस्थेचे सचिव सदानंद बोरकर तथा सामान्य रुग्णालय चंद्रपूर येथील जिल्हा कार्यक्रम अधिकारी सुमंत पानगंटीवार यांच्या हस्ते विजेत्याना पारितोषिक देऊन गौरविण्यात आले. यावेळी धुमनखेडा प्राथमिक आरोग्य अधिकारी डॉ.दिशा जैतवार आणि इतर मान्यवर उपस्थित होते.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

हे देखील वाचा :-

वन्य प्राण्यांच्या हल्ल्यात मृत पावलेल्या व्यक्तीच्या नातेवाईकांना आता मिळणार २० लाख रुपये !

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

 

 

Comments are closed.