Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

15 लाखांचं बक्षीस असलेला जहाल नक्षलवादी अखेर जेरबंद; महाराष्ट्र ATS ची मोठी कारवाई

नालासोपाऱ्यातून जहाल नक्षलवाद्याला केली अटक.

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, 

मुंबई डेस्क, दि. १८ सप्टेंबर : दहशतवाद विरोधी पथकाने आज एक मोठी कारवाई करत नालासोपारातून एका जहाल नक्षलवाद्याला अटक केली आहे. कारू हुलाश यादव (४५) असे त्या दहशतवाद्याचे नाव असून तो मूळचा झारखंडमधील हजारीबागचा आहे.

एटीएसने दिलेल्या माहितीनुसार, हुलाश यादव हा रविवारी पहाटे नालासोपारा येथील रामनगर येथील धानवीतील एका चाळीत औषधोपचाराकरीता येणार असल्याची माहिती मिळाली होती. त्यामुळे त्यानुसार पथकाने सापळा रचत याठिकाणी छापा टाकून यादवला ताब्यात घेतले.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

जहाल नक्षलवादी – कारू   हुलाश यादव

कारू हा केंद्र सरकारने बंदी घतलेल्या कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया माओ या संघटनेचा नक्षलवादी आहे. तो २००४ पासून नक्षली कारवायांमध्ये सक्रीय असून त्याच्यावर सरकारने १५ लाखांचे बक्षीस ठेवले होते. कारु हा औषधोपचारासाठी नालासोपारा येथे आला होता. दहशतवादी विरोधी पथकाच्या ठाणे युनिटने ही कारवाई केली आहे. 

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

हे देखील वाचा : 

सचिवांना दिलेले अधिकार काढले ! सरकारचा झाला निर्णय 

कातकरी बांधवांची पिळवणूक .

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.