Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

शिंदे गटाकडून निवडणूक आयोगाला तीन पर्यायी चिन्हांचा इमेल

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

मुंबई 11 ऑक्टोबर :- शिवसेनेला नवं नाव आणि पक्षचिन्ह मिळालं आहे.  तर शिंदे गटाला नाव तर मिळाले आहे, पण अजूनही पक्षचिन्ह मिळाले नाही. त्यामुळे आता शिंदे गटाला आजच निवडणूक आयोगाकडे पर्याय द्यावे लागणार आहे. अखेरच्या क्षणी ईमेलद्वारे शिंदे गटाकडून ३ पर्यायी चिन्ह पाठवले आहे. शंख, रिक्षा, तुतारी फुंकणारा माणूस ही चिन्हं सादर केल्याची माहिती समोर आली आहे.
केंद्रीय निवडणूक आयोगाने उद्धव ठाकरे गटाच्या पक्षाला ‘शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)’ हे नाव आणि ‘धगधगती मशाल’ हे निवडणूक चिन्ह दिले. तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाच्या पक्षाला ‘बाळासाहेबांची शिवसेना’ हे नाव बहाल केले. मात्र, शिंदे गटाला कोणतेही चिन्ह मिळू शकलेले नाही. शिंदे गटाने त्रिशूळ, उगवता सुर्य आणि गदा असे चिन्ह दिले होते. पण, आयोगाने ते रद्द ठरवले.

हे पण वाचा :-

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

शिवसेनेचे अखेर ठरल !

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.