Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

इंग्लंड ने केले सेमी फायनलमध्ये आपले नाव निश्चित

श्रीलंकेचा केला पराभव

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

टी-20, 05 नोव्हेंबर :- इंग्लंड संघ ने श्रीलंकेचा पराभव करत सेमी फायनल मध्ये आपले नाव निश्चित केले आहे. त्यामुळे यजमान ऑस्ट्रेलिया संघ स्पर्धेबाहेर झाला आहे. श्रीलंकेने प्रथम फलंदाजी करत निर्धारित 20 षटकात 141 धावा केल्या होत्या. शेवटच्या षटकापर्यंत गेलेल्या सामन्यामध्ये इंग्लंड ने हे आव्हान पूर्ण करत सेमी फायनलमध्ये आपला प्रवेश निश्चित केला आहे. इंग्लंडने 4 विकेट्स राखून विजय प्राप्त केला.

श्रीलंकेने 20 षटकात 8 बाद 141 धावा केल्या होत्या. त्याचा पाठलाग करतांन इंग्लंडची सुरूवात चांगली नव्हती. मात्र बेन स्टोक्स ने 36 चेंडूत नाबाद 44 धावांची खेळी करत सामना जिंकून दिला. इंग्लंडकडून सलामीवीर एलेक्स हेल्स ने 47 धावांची महत्वपूर्ण खेळी खेळली. श्रीलंकेकडून हसरंगा, डिसेल्वा आणि कुमारा यांनी प्रत्येकी 2 विकेट्स घेतल्या.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

हे पण वाचा :-

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.