Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

विद्यार्थ्यांच्या शिक्षणाला लॉईड्सची साथ; कोणसरीत ८३ विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तकांचे वाटप

लॉईड्स मेटल्स अँड एनर्जी लिमिटेड व लॉईड्स इन्फिनिट फाऊंडेशनचा शैक्षणिक उपक्रम...

0

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

कोणसरी : ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीला चालना देण्याच्या उद्देशाने लॉईड्स मेटल्स अँड एनर्जी लिमिटेड आणि लॉईड्स इन्फिनिट फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा परिषद हायस्कूल, कोणसरी येथे मोफत शालेय पाठ्यपुस्तक वितरण कार्यक्रम उत्साहात पार पडला. या उपक्रमांतर्गत इयत्ता ९ वी ते १२ वीपर्यंत शिक्षण घेणाऱ्या ८३ विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तकांचे विनामूल्य वितरण करण्यात आले.

शैक्षणिक साहित्याचा आर्थिक भार कमी करून विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी प्रोत्साहन देणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा परिषद हायस्कूलचे मुख्याध्यापक कोहाडे सर होते. प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित असलेले बेणूगोपाल सर, प्रशासन विभागप्रमुख, लॉईड्स मेटल्स अँड एनर्जी लिमिटेड यांनी विद्यार्थ्यांना शिक्षणाचे महत्त्व पटवून देत, सातत्य, शिस्त आणि कठोर परिश्रमाच्या बळावर जीवनात यश संपादन करण्याचा संदेश दिला.

यावेळी शाळेतील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी तसेच लॉईड्स मेटल्स अँड एनर्जी लिमिटेडच्या कॉर्पोरेट सामाजिक दायित्व (सीएसआर) विभागातील अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

मोफत पाठ्यपुस्तके मिळाल्याने विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले. पालक आणि शिक्षकांनीही लॉईड्स मेटल्स अँड एनर्जी लिमिटेड व लॉईड्स इन्फिनिट फाऊंडेशनच्या सामाजिक बांधिलकीचे कौतुक करत, ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी अशा शैक्षणिक उपक्रमांची सातत्याने अंमलबजावणी व्हावी, अशी अपेक्षा व्यक्त केली.

Leave A Reply

Your email address will not be published.