Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

टीएमसीचे नाराज मंत्री शुभेन्दु अधिकारी यांचा केंद्रीय गृहमंत्री अमित शाहंच्या उपस्थितीत भाजप मध्ये प्रवेश

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

वृत्तसंस्था, दि. १९ डिसेंबर: केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आजपासून दोन दिवसांच्या पश्चिम बंगालच्या दौऱ्यावर आहेत. पश्चिम बंगालच्या आगामी विधानसभा निवडणुकीपूर्वी ममता बॅनर्जींच्या तृणमूल कॉंग्रेसला आणखी एक मोठा झटका बसलाय. टीएमसीचे नाराज मंत्री शुभेन्दु अधिकारी यानी केंद्रीय गृहमंत्री अमित शाहंच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला आहे.

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या उपस्थितीत मिदनापूर येथे एका रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं. त्या रॅलीदरम्यान तृणमूलचे मंत्री शुभेन्दु अधिकारी, खासदार सुनिल मंडल आणि  10 आमदारांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. यात सहा तृणमूलचे, दोन सीपीएमचे, कॉंग्रेस आणि सीपीआयच्या प्रत्येकी एका आमदाराचा समावेश आहे. पश्चिम बंगालमध्ये भाजपमध्ये राजकीय इनकमिंग जोरात सुरु आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

ममता बॅनर्जींच्या गडाला अशा प्रकारे भगदाड पाडल्यानंतर अमित शाहंनी त्यांच्यावर जोरदार टीका केली. ते म्हणाले की, “काही बडबड्या नेत्यांनी सांगितलं की बंगालमध्ये तृणमूलला कोणीही हारवू शकत नाही. लोकसभा निवडणुकीच्या आधी असं सांगितलं जायचं की बंगालमध्ये भाजप खातंही खोलू शकणार नाही. पण भाजपने या राज्यात 18 जागांवर विजय मिळवला. आता विधानसभा निवडणूक येईपर्यंत ममता बॅनर्जी एकट्या पडतील.”

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह पुढं म्हणाले की, “भाजपमध्ये आज जे लोक प्रवेश करत आहेत त्यांनी ‘मां माटी मानुष’ या विचारांनी राजकारण सुरु केलं होतं. पण ममता बॅनर्जी यांनी ‘मां माटी मानुष’ ला टोलबाजी, परिवारवाद, तिरस्कारवाद आणि हप्ता वसूलीत रुपांतर केलं. ममता बॅनर्जींनी कॉंग्रेस सोडली. तेही एक पक्षांतरच होतं. आज सगळ्या पक्षातील चांगले लोक भाजपमध्ये येत आहेत. भाजप यावेळी 200 जागा जिंकेल आणि पश्चिम बंगालमध्ये सरकार स्थापन करेल.”

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

Comments are closed.