Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

दिल्लीत 14 वर्षांच्या मुलीवर सामूहिक बलात्कार

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

नवी दिल्ली डेस्क, 21 डिसेंबर : देशाची राजधानी दिल्लीमध्ये निर्भयावर काही वर्षांपूर्वी झालेल्या बलात्कारानं संपूर्ण देश हादरला होता. दिल्लीमधील ग्रेटर कैलाश भागात 14 वर्षांच्या मुलीवर सामूहिक बलात्कार करणाऱ्या चार आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. या आरोपींमधील एक जण अल्पवयीन आहे.

पीडित मुलगी ग्रेटर कैलाश भागात गेल्या चार महिन्यांपासून कामाला होती. या कामाच्या दरम्यान या प्रकरणातील अल्पवयीन आरोपीची तिची ओळख झाली. त्या आरोपीनं महिनाभरापूर्वीच काम सोडले होते. त्याने पीडित मुलीला त्याच्या घरी भेटायला बोलावले होते. तिथे अन्य तीन आरोपी देखील उपस्थित होते, या सर्वांनी त्या ठिकाणी तिच्यावर सामूहिक बलात्कार केला.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

पीडित मुलीने सामूहिक बलात्कार झाल्याची तक्रार केली होती. त्यानंतर पोलिसांनी सर्च ऑपरेशन करत सर्व आरोपींना अटक केली आहे. त्यांच्यावर पॉस्को कायद्यासह वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

Comments are closed.