Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

सौरव गांगुलीला सौम्य हृदयविकाराचा धक्का

व्यायामशाळेत व्यायाम करताना सौरव गांगुलींची तब्येत बिघडली आहे.

कोलकात्याच्या वुडलॅंड्स रुग्णालयात दादावर उपचार सुरू.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

कोलकाता 02 जानेवारी:- बीसीसीआयचे अध्यक्ष आणि टीम इंडियाचे माजी कर्णधार सौरव गांगुली यांना ह्रदयविकाराचा सौम्य झटका आल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. तब्येत अचानक बिघडल्यामुळे त्यांना कोलकाताच्या वुडलँड्स रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, व्यायामशाळेत व्यायाम करताना त्याची तब्येत बिघडली आहे. हात आणि पाठीत दुखत असल्याने आणि डोळ्यासमोर अंधारी आल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

सूत्रांनुसार गांगुलीला यानंतर गांगुलीने वुडलॅंड्स रुग्णालयात तपासणी करुन घेतली. तपासणीत छातीत गंभीर त्रास असल्याचं निदान झालं. यानंतर रुग्णालयाकडून गांगुलीवर अँजियोप्लास्टी सर्जरी करण्यात येणार आहे. डॉक्टर सरोज मंडल तसेच इतर 3 डॉक्टर हे गांगुलीवर अँजियोप्लास्टी करणार आहेत.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

Comments are closed.