Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

ब्रेकिंग… विराट कोहलीच्या घरी पाळणा हलला.

Get real time updates directly on you device, subscribe now.

  • विराट कोहली आणि अनुष्काला “कन्यारत्न”

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

मुंबई डेस्क ११ जानेवारी :- भारतीय क्रिकेट टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली यांच्या घरी पाळणा हलला आहे. विराटची पत्नी अभिनेत्री अनुष्का शर्माने मुलीला जन्म दिला आहे. विराट कोहलीने ट्विट करून चाहत्यांना ही गोड बातमी दिली आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

अनुष्का शर्मा यांनी सोमवारी दुपारी मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात मुलीला जन्म दिला आहे. यानंतर विराट कोहलीने सोशल मीडियावर एक अधिकृत स्टेटमेंट शेअर करत चाहत्याला ही खुशखबर दिली आहे.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

आम्हाला सांगण्यास आनंद होतो की आज दुपारी आमच्या घरी कन्यारत्नाने जन्म घेतलाआहे. तुमच्या प्रेम आणि मंगल कांमनेसाठी सहृदयी आभारी आहोत. बाळ आणि बाळंतीण दोघेही सुखरूप आहेत अशी पोस्ट विराटने शेअर केली आहे. तसेच आम्ही सौभाग्यशाली आहोत की आम्हाला हा अनुभव मिळतोय.

तसेच तुम्ही समजून घ्याल  की अशा वेळी आम्हाला थोडीशी प्रावेशी हवे असेल असे त्याने आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे. विराट कोहली अनुष्का यांच्या बाळंतपणासाठी आस्ट्रेलिया दौरा सोडून मायदेशी परतला होता. त्यानंतर तो अनुष्काची सतत काळजी घेताना दिसला. तिच्यासोबत तो देखील रुग्णालयात चेकअपसाठी जात होता. आता विरुष्का ने कन्यारत्न झाल्याची गोड बातमी दिल्यानंतर चाहत्यांनी त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.