Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

धक्कादायक! दिवाळीदीनी मध्यरात्री युवकाने गळफास लावून केली आत्महत्या!!

गोंदिया जिल्ह्यातील देवरीच्या फुटाना गावातील घटना.

Get real time updates directly on you device, subscribe now.

  • एकाच फांदीला वेगवेगळ्या दोन दोरीने दोन गळफास
  • दोन लोक करत होते आत्महत्या शंकेला उधान?

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

गोंदिया, ५ नोव्हेंबर : दिवाळी लक्ष्मीपूजन दिनाच्या मध्यरात्री युवकाने गळफास लावून आत्महत्या केल्याची दुर्देवी घटना गोंदिया जिल्हाच्या देवरीच्या फुटाना गावात घडली आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

कैलास रामलाल कोचे (२५) असे मृतकाचे नाव आहे. विशेष म्हणजे एकाच फांदीला वेगवेगळ्या दोन दोरीने दोन गळफास लटकून असल्याने दोन लोक एकाच वेळी आत्महत्या करत होते की काय? या शंकेला उधान आले आहे.

देवरी तालुक्यातील फुटाना येथील कैलास दिवाळीच्या दिवशी रात्री दोन वाजताच्या सुमारास घरच्या लोकांना कोणत्याही प्रकारची माहिती न देता घरुन निघुन जातो. सकाळ होऊनही घरि न परतल्याने घरच्यांनी शोधाशोध केली असता फुटाना ते कलुसावटोला पायदान रस्त्यालगत असलेल्या जांभळीच्या झाडावर कैलास हा गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळुन आला.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

विशेष म्हणजे ज्या जांभळीच्या झाडाच्या फांदीवर गळफास लागला त्या फांदीला वेगवेगळ्या दोन दोरीने दोन गळफास बांधलेले होते त्यापैकी एकाला मृतक कैलास कोचे लटकलेला होता तर दुसरा गळफास रिकाम्या अवस्थेत कसा? हा प्रश्न गावकऱ्यांना निर्माण झाला. तसेच त्याचा मोबाईल खिशात नसून झाडाखाली कसा?  दुसरा आत्महत्या करणारा कोण? असे एक ना अनेक चर्चा गावातील नागरिकांत सुरु आहे.

याबाबत पोलीस स्टेशन चिचगड येथे फिर्याद नोंद करण्यात आली असुन फौजदारी कलम १७४ अन्वये पुढील तपास पोलीस स्टेशन चिचगड पोलिस करीत आहेत.

हे देखील वाचा :

मिस्टर महाराष्ट्र नेक्स्ट स्टार आयकॉन २०२१ स्पर्धेत विजय घोलपे प्रथम

नानाभाऊ पटोले यांनी घेतला आरमोरी विधानसभा क्षेत्राचा आढावा

नाशिक येथील औद्योगिक विकास महामंडळ (MIDC) कर्मचारी कामावरून अचानक बेपत्ता!

 

 

 

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.