Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

तुम्हाला खरंच देश वाचवायचा आहे का ? – फक्त एवढं करा !

- ज्ञानेश वाकुडकर

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

विश्वास ठेवा अगर ठेवू नका, पण आपला देश जवळ जवळ तुमच्या – माझ्या हातातून गेल्यासारखा आहे. आपल्याला शेवटची संधी २०२४ ला मिळणार आहे. त्याआधी उत्तरप्रदेश मधील जनतेला मुळावर घाव घालण्याची ऐतिहासिक संधी आहे. तुम्हाला खरंच आपला देश वाचवायचा असेल, तर एवढं करा..
• देश सैतानांच्या हातात गेला आहे, हे खरं असलं तरी, ‘सैतानाला पराभूत करणं अशक्य आहे’ या न्यूनगंडातून बाहेर या.
• ‘पर्याय कोण’ असले बालिश प्रश्न विचारू नका. विकृतीला समूळ नष्ट करायची असते. तिला पर्याय शोधायचा नसतो. आणि परिस्थितीनुरुप योग्य पर्याय आपोआप समोर येत असतो. चिंता करू नका.
• ही समस्या दोन/चार विकृत लोकामुळे निर्माण झाली, असं नव्हे. अख्खा लांडग्यांचा कळप गावातून हाकलून द्यायचा आहे, हे लक्षात ठेवा. या बाबतीत स्वतःही कन्फ्युज होऊ नका. इतरांना करू देवू नका.
• तुम्ही एकटे आहात, हे मनातून काढून टाका.
• ‘लोक समोर येत नाहीत, लोक घाबरतात, लोक ‘त्यांच्या’च बाजूला आहेत’ हे रडगाणं बंद करा.
• मी सामान्य माणूस आहे, मी काय करू शकतो ? माझ्या हातात काय आहे ? हे पालुपद बंद करा. देशात लोकशाही आहे आणि एक व्यक्ती एक मत, ह्या सूत्रात प्रचंड मोठं सामर्थ्य आहे, याची जाणीव ठेवा. हे सर्वात आधी तुमच्या जवळच्या लोकांना पटवून द्या. घरच्या लोकांना पटवून द्या.
• तुम्ही त्रस्त आहात, तसेच शेकडो, हजारो, लाखो, करोडो लोकही परेशान, अस्वस्थ आहेत, याची खात्री बाळगा.
• ‘मी यांच्याशी लढणार आहे. मी या तडीपार, देशद्रोही गँगला, त्यांच्या पक्षाला कुठल्याही परिस्थितीत मतदान करणार नाही’ असा निर्धार करा. तशी शपथ घ्या. मित्रांना, नातेवाईकांना, समाजाला हे ठासून सांगा. पुन्हा पुन्हा सांगत रहा. त्यांनाही तसे करायची विनंती करा.
• सैतानाच्या कळपात काही लोक स्वार्थापोटी तर काही भीतीपोटी सामील झालेले आहेत. काही लोकांना त्यांची घोडचूक लक्षात येत आहे. अशा लोकांशी जरा सबुरीने वागा. त्यांना हिडीस फिडीस करू नका. चुका प्रत्येकाच्याच होत असतात. (मात्र कितीही मोठे असले तरी तुम्ही त्यांच्या आहारी जाऊ नका. पुन्हा त्यांच्या नादी लागू नका. त्यांच्यापासून सतत सावध रहा.) मात्र जे अगदीच मूर्ख आहेत, अंधभक्त आहेत, त्यांच्याशी ताबडतोब संबंध तोडा. उगाच वाईट वाटू नये म्हणून गोड गोड बोलू नका किंवा वादही घालू नका. प्रश्न देशाच्या अस्तित्वाचा, सामाजिक समतेचा, बंधुभावाचा आहे, हे ध्यानात ठेवा. अशा अंधभक्तांना आपल्या फ्रेंडलिस्ट मधून ताबडतोब कमी करा.
• जो देशाचा विचार करू शकत नाही, जो स्वार्थासाठी देशाशी गद्दारी करतो, तो तुमचाही होऊ शकत नाही, हे लक्षात घ्या.
• हे करत असताना कोणत्याही विशिष्ट जाती समूहाला सरसकट टार्गेट करू नका. इतरांनाही तसे करू देवू नका. स्वार्थी, बदमाश लोक सर्वत्रच आहेत. ते आपल्याही जातीसमूहात आहेत, याचे भान ठेवा. दोषी लोकांचा विरोध करा. सरसकट समूहाचा नाही.
• एखादी व्यक्ती आपल्या जातीची आहे, नात्यातली आहे, आपल्या भाषेची, प्रदेशाची आहे, एवढ्या कारणासाठी त्याचे गुन्हे, अपराध पाठीशी घालू नका. त्यातूनच नवे भस्मासुर पैदा होतात, याचे भान ठेवा. अशांचा स्पष्ट विरोध करा.
• दलाल मीडियावरील बातम्या पाहणे बंद करा. अशा चॅनेलवर बहिष्कार टाका. सोशल मीडियाचा वापर करा. त्यांच्या बातम्या बघा. योग्य बातम्या देणारे YouTube चॅनल कोणते आहेत, त्याची माहिती एकमेकांना द्या. असे बरेच चॅनल्स आहेत. त्यांना सबस्क्राईब करा. शक्य तेवढे आर्थिक सहकार्य करा.
• घरात बसून किंवा फुकटात क्रांती होईल, ही मानसिकता आता सोडून द्या. देशासाठी, पुढील पिढ्यांसाठी त्याग करायला शिका.
• चुका इतरांच्या होतात, तशा आपल्याही होऊ शकतात. आत्मचिंतन करा. झालेल्या चुका मोकळेपणाने मान्य करा. त्या दुरुस्त करून पुढे जाण्याचा प्रयत्न करा.
• एक दिवस सर्वांनाच मरायचे आहे. पण इतिहास मात्र लढणारांची अभिमानाने नोंद घेतो, याची जाणीव ठेवा. कुत्र्या-मांजरासारखी लाचारी पत्करून रोज रोज मरण्यापेक्षा स्वाभिमानाने जगायला शिका.
• हा मेसेज कमीतकमी २५ लोकांना पाठवा. पुन्हा पुन्हा पाठवत रहा. इतरांनाही पाठवायला सांगा.
• गुड मॉर्निंग, गुड नाईट, वाढदिवस, पुण्यतिथी असले मेसेज पाठवण्यात स्वतःचा व इतरांचाही वेळ वाया दवडू नका. अगदीच जवळच्या व्यक्ती असतील तरच आणि आवश्यक असेल तिथेच असे मेसेज करा.
• देश माणसांनी बनतो. माणसाची सेवा, त्याचे हित म्हणजेच राष्ट्रहित, तीच खरी देशभक्ती आहे. नदी, नाले, पहाड, जंगल, गाय, बैल ही देशाची संपत्ती आहे. या संपत्तीची काळजी जरूर घ्या. पण माणसांना उपाशी ठेवून जनावरांची, नदी – नाल्यांची पूजा करणे, हा शुद्ध मूर्खपणा आहे. त्यांची स्वच्छता वेगळी, काळजी घेणे वेगळे आणि पूजा करणे वेगळे, याचे भान असू द्या. असल्या कारस्थानात सहभागी होऊ नका.
• ‘लोकजागर’ आपल्यापरीने काम करत आहे. पूर्व विदर्भाच्या पाच जिल्ह्यांचा आमचा दौरा ऑगस्ट महिन्यात पार पडला. पश्चिम विदर्भातील पाच जिल्ह्यांचा दौरा डिसेंबरमध्ये पूर्ण होईल. नंतर बाकी महाराष्ट्रासाठी नियोजन करू. एप्रिल २०२२ मध्ये राज्यव्यापी परिषद आयोजित करण्यात येत आहे. त्यात सहभागी व्हा. पुढील नियोजनासाठी १४ नोव्हेंबरला नागपूर येथे मीटिंग बोलावली आहे. ( संपर्क – 8446000461• 8605166191 )
• ‘लोकजागर’ हे एक मिशन आहे. नोंदणीकृत सामाजिक संस्था आहे. शिक्षण, आरोग्य, कृषी, उद्योग, रोजगार, न्यायव्यवस्था, युवक, महिला, धर्म, समाजकारण, राजकारण, अधिकार, कर्तव्ये आदी विषयावर स्वतंत्र मांडणी आहे. ती कृपया समजून घ्या. अकरा कलमी कार्यक्रम समजून घ्या. चर्चा करा. त्रुटी असतील तर आम्हाला सांगा. आणि भूमिका योग्य असेल, तर कृपया त्याचा प्रचार, प्रसार करा. ‘लोकजागर’मध्ये सहभागी व्हा. तन-मन-धनाने सहकार्य करा.
• ‘लोकजागर मिशन’ बाबतची सविस्तर माहिती/अकरा कलमी कार्यक्रम ‘समतावादी हिंदू धर्म आणि नवा भारत..’ या पुस्तकात दिलेला आहे. पुस्तक खरेदी करा. स्वतः वाचा. इतरांना भेट द्या. पुस्तक घरोघरी पोहचेल, यासाठी मनापासून सहकार्य करा. धन्यवाद.

तूर्तास एवढंच..

ज्ञानेश वाकुडकर
अध्यक्ष,
लोकजागर – 9822278988

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

हे देखील वाचा :

मिस्टर महाराष्ट्र नेक्स्ट स्टार आयकॉन २०२१ स्पर्धेत विजय घोलपे प्रथम

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

नानाभाऊ पटोले यांनी घेतला आरमोरी विधानसभा क्षेत्राचा आढावा

धक्कादायक! दिवाळीदीनी मध्यरात्री युवकाने गळफास लावून केली आत्महत्या!!

 

 

Comments are closed.