Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

भीषण अपघात! टँकर व दुचाकीची जोरदार धडक; धडकेत तिघांचा दुर्दैवी मृत्यू

रायगड जिल्ह्यातील पनवेल तालुक्यातील तळोजा येथील घटना. महापालिकेच्या दोन सफाई कामगारांसह सिडकोच्या माळी कामगाराचा मृत्यू.

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

रायगड, दि. २९ नोव्हेंबर: पनवेल तालुक्यातील तळोजा येथील दिपक फर्टिलायझर कंपनी जवळच्या रस्त्यावर झालेल्या भीषण अपघातात पनवेल महापालिकेच्या दोन कंत्राटी सफाई कामगारांसह सिडकोच्या माळी कामगाराचा मृत्यू झाला आहे.

पनवेल महानगरपालिकेत काम करणारे दोन कंत्राटी सफाई कामगार तसेच सिडकोचा एक माळी कामगार हे तळोजा एमआयडीसीतील काम करून मोटार सायकलवरून घरी परत जात होते. दिपक फर्टिलायझर कंपनी जवळच्या रस्त्यावर एका टॅंकरखाली चिरडून शांताराम निरगुडा (२७) आणि काळुराम पारधी (२७) या दोन सफाई कामगारांचा जागीच मृत्यू झाला तर अपघातात त्यांच्यासोबत त्यांचा मित्र भुऱ्या पारधी (माळी कामगार) गंभीर जखमी झाल्याने त्याला एमजीएम हॉस्पिटलमध्ये दाखल  केले असता उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

अपघात झाल्याचे कळताच घटनेस्थळी नागरिकांची मोठी गर्दी जमा झाली. यावेळी स्थानिक नागरिकांनी तीव्र आंदोलन केले. या घटनेची माहिती पोलिसांना प्राप्त होताच त्यांनी ताबडतोब घटनास्थळी पोहचून जमावाला शांत केले.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

दरम्यान साई गणेश इंटरप्रायझेस या कंपनीचे व्यवस्थापक राकेश भुजबळ यांनी या वृत्ताला दुजोरा देत सांगितले की “याबाबत आम्ही ताबडतोब महापालिका आयुक्त गणेश देशमुख यांना माहिती दिली असून आमच्या कंपनी मार्फत मृत कामगारांच्या कुटुंबातील वारसांना जास्तीत जास्त योग्य ती मदत करता येईल. तसेच त्यांची सर्व कायदेशीर देणी देता येईल याबाबत कार्यवाही केली जाईल”, असे आश्वासन गणेश इंटरप्रायझेस या कंपनीचे व्यवस्थापक राकेश भुजबळ यांनी दिले असुन सदर घटनेचा अधिक तपास पोलीस विभागाचे कर्मचारी करीत आहे.

हे देखील वाचा :

आश्चर्यकारक! एका महिलेन नवऱ्याला घटस्फोट देत कुत्र्याशी केल लग्न…

धक्कादायक!! २० वर्षीय मुलीवर अत्याचार करून केली हत्या!

कोरोनाच्या नव्या व्हेरियंटला महाराष्ट्रापासून दूर ठेवण्यासाठी प्रशासन सज्ज!

 

 

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.