Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

आश्चर्यकारक! एका महिलेन नवऱ्याला घटस्फोट देत कुत्र्याशी केल लग्न…

यूनायटेड किंगडममध्ये राहणाऱ्या एका महिलेनं ४७ वर्षाच्या वयात आपल्या पतीला घटस्फोट दिल्यानंतर तिनं पाळीव कुत्र्याला आपला जोडीदार म्हणून निवडलं.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

वृत्तसंस्था, दि. २७ नोव्हेंबर : पती आणि पत्नीमध्ये भांडण होणे साहजिकच असते. संसार म्हटलं की भांड्याला भांडं लागणारंच, पण एवढे करूनही दोघांमध्ये प्रेम कायम राहते. तर काही जोडपी यात अशी ही असतात जी प्रत्येकवेळी भांडणानंतर काही गोष्टी मनात साठवून ठेवतात. याच गोष्टींमुळे अनेकवेळा नात्यात दुरावा निर्माण होऊन गोष्टी घटस्फोटापर्यंत पोहोचतात.

परंतु आजच्या युगात पती आणि पत्नीचा  घटस्फोट होणं ही तशी काही नवीन बाब नाही. मात्र एका महिलेन पतीला सोडून आपल्या पाळीव प्राण्यासोबत लग्न केलं तर हे नक्कीच आश्चर्यकारक वाटणारं आहे. इतकंच नाही तर या महिलेने आपण पतीपेक्षाही कुत्र्यासोबत लग्न केल्यानंतर अतिशय आनंदात असल्याचा दावा केला आहे. चला तर जाणून घेऊन नेमकं काय आहे हे प्रकरण…

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

अमांडा रॉजर्स नावाची ही महिला लंडनची रहिवासी आहे. ४७ व्या वर्षी अमांडाने आपल्या पतीपासून घटस्फोट घेतल्यानंतर तिच्या पाळीव मादी कुत्र्याशी लग्न केले. आपल्या कुत्र्याचीच आपला जोडीदार म्हणून निवड केल्याने मी खूप आनंदी असल्याचे महिलेने सांगितले आहे. ‘द सन’ या वेबसाइटवर प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार, अमांडाने आपल्या कुत्र्याशी २०१४ मध्ये थाटामाटात लग्न केले होते. त्यावेळी २०० लोकांच्या उपस्थितीत तिने आपला पाळीव कुत्रा शीबाला आपला साथीदार म्हणून निवडले. तेव्हापासून ती आनंदी जीवन जगत असल्याचे अमांडाचे म्हणणे आहे.

पतीपासून घटस्फोट घेतल्यानंतर अमांडा एकटीच आपले जीवन व्यथीत करत होती. यालाच कंटाळून एके दिवशी तिने आपल्या पाळीव कुत्र्यासोबत पूर्णपणे पारंपरिक पद्धतीने लग्न केले. अमांडा म्हणणे आहे की, शीबा हा आज तिच्या आयुष्यातील एक महत्त्वाचा भाग बनला आहे. शीबा (मादी कुत्रा) तिची काळजी तर घेतोच शिवाय तिला नेहमी दुःखातून बाहेर येण्यास मदतही करतो. एका टीव्ही शोदरम्यान अमांडाने सांगितले की, ती २ महिन्यांची असल्यापासून शीबाच्या प्रेमात पडली होती.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

शीबाच्या डोळ्यात आपल्याला खरे प्रेम दिसते, असे या महिलेचे म्हणणे आहे. अमांडाने सांगितलं की, शीबाला (मादी कुत्रा) आपला साथीदार म्हणून निवडण्यापूर्वी तिने त्याला गुडघ्यावर बसून प्रपोज देखील केले होते. ज्याला शीबाने शेपटी हलवून उत्तर दिले. अमांडा आणि शीबामधलं हे प्रेम लोकांना मूर्खपणा असल्याचं वाटू शकतं, मात्र अमांडाला याचा काही फरक पडत नाही. ती म्हणाली आहे की, ती शीबासोबत खूप आनंदी आयुष्य जगत आहे.

हे देखील वाचा :

जागेच्या वादावरून काठीने मारहाण झाल्याने उपसरपंचाचा मृत्यू…

धक्कादायक!! २० वर्षीय मुलीवर अत्याचार करून केली हत्या!

गडचिरोली ब्रेकिंग : नक्षल्यांनी केली दोन ट्रक्टरची जाळपोळ ..

Comments are closed.