Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

सामाजिक न्याय भवन येथे संविधान दिन साजरा

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

गडचिरोली, दि. २६ नोव्हेंबर : सामाजिक न्याय भवन, गडचिरोली येथे भारतीय संविधान दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती गडचिरोलीचे  उपायुक्त देवसुदन धारगावे हे या कार्यक्रमाचे अध्यक्ष होते. तर प्रमुख अतिथी समाज कल्याण कार्यालय गडचिरोली चे साह. लेखाधिकारी  पी.बी. तलमले,   महात्मा फुले महामंडळचे  जिल्हा व्यवस्थापक  एम.डी. बारमासे यांची उपस्थिती होती. 

कार्यक्रमाची सुरुवात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार व दीप प्रज्वलन करून  करण्यात आली.  यावेळी बार्टीचे प्रकल्प अधिकारी मनीष गणवीर यांनी भारतीय संविधान उद्देशिकेचे वाचन करून बार्टीच्या योजने विषयी विस्तृत माहिती थोडक्यात दिली. 

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

कार्यक्रमाचे अध्यक्ष धारगावे यांनी आपल्या भाषणात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी “१७ नोव्हेंबर १९४९ रोजी  भारतीय घटनेचा अंतिम मसुदा घटना समिती समोर सादर केला होता. त्या संदर्भातील माहिती व सदस्यांनी मांडलेले विचार व्यक्त केले.  यामध्ये मसुदा समितीमध्ये जसपतराय कपूर यांनी मांडलेले विचार असे पूर्वी माझ्या मनात आंबेडकरांबद्दल बराच पूर्वग्रह होता म. गांधी स्वतंत्र मतदार संघाच्या प्रश्नावर उपोषण केले होते, त्यावेळी बोलावणे म्हणून पाठवूनही आंबेडकर यांनी म्हटले कि मला महत्वाचे काम आहेत व तीन दिवसपर्यंत त्यांना भेटले नाहीत. त्या घटनेमुळे माझ्या मनात आंबेडकरांबद्दल अधी निर्माण झाली होती, परंतु गेल्या तीन वर्षापासून आंबेडकरांनी रात्रंदिवस जे महान कार्य केले, जे राष्ट्रीय दृष्टीने देखील महत्वाचे आहे, त्यावरून माझ्या मनातील सर्व शंका संदेह तर नस्त झालाच परंतु आदरही निर्माण झाला आणि माझ्या मते आज भारतातील सर्वश्रेष्ठ राष्ट्राभक्तात त्यांची गणना करायला हवी. अनेकदा काही महत्वाच्या प्रश्नावर तोडगा निघत नसे अश्या वेळी आंबेडकर हे उपयुक्त व व्यवहारी सूचना करीत असत. त्यामुळे प्रश्न तात्काळ सुटत होते” अशी बाबासाहेबांची आठवण केली. आपल्याला समाजात मोठे व्हायचे असेल तर अभ्यास करून यश संपादन करावे असे प्रतिपादन विद्यार्थ्यांना केले.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

या कार्यक्रमात नंदरधने, कंकनलवार, कामडी, लांजेवार, कोकोडे, रामटेके,  श्रीमती श्वेता लक्कावार, कु. नूतन डबले, सुनील राठोड, रणजीत लेदारे तसेच सर्व तालुका समन्वयक व समाज कल्याण कार्यालय व जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती कार्यलय गडचिरोलीतील आदी अधिकारी कर्मचारी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे संचालन तसेच आभार बार्टी प्रकल्प अधिकारी मनीष गणवीर यांनी केले.

 

हे देखील वाचा : 

डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्थामार्फत माविम कार्यालयात संविधान दिन साजरा

डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्थेकडून (बार्टी) विद्यार्थी दिवस साजरा

बार्टी कडून महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांच्या जयंती निमित्त अभिवादन

 

 

 

Comments are closed.