Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

बार्टी कडून महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांच्या जयंती निमित्त अभिवादन

लोकस्पर्श न्युज नेटवर्क

गडचिरोली, दि. २ ऑक्टोंबर: डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था बार्टी गडचिरोली, जिल्हा समाज कल्याण कार्यालय गडचिरोली व जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती गडचिरोली च्या वतीने राष्ट्रपिता महात्मा गांधी व भारताचे दुसरे पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांची जयंती साजरी करण्यात आली.

सर्वप्रथम दोन्ही महापुरुष यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन त्यांना अभिवादन करण्यात आले. महात्मा गांधी भारताच्या स्वातंत्र्य संग्रामातील प्रमुख नेते आणि तत्त्वज्ञ होते. अहिंसात्मक मार्गांनी स्वातंत्र्य मिळवण्यासाठी त्यांनी संपूर्ण जगाला प्रेरित केले. रवींद्रनाथ टागोर यांनी सर्वप्रथम त्यांना ‘महात्मा’ (अर्थ: महान आत्मा) ही उपाधी दिली.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

भारतातील लोक त्यांना प्रेमाने बापू म्हणत , त्यांना भारताचे राष्ट्रपिता म्हटले जाते. गरिबी निर्मूलन, आर्थिक स्वावलंबन, स्त्रियांचे समान हक्क, सर्व-धर्म-समभाव, अस्पृश्यता निवारण आणि महत्त्वाचे म्हणजे स्वराज्य यासाठी देशभरात चळवळ चालू केली. लालबहादूर शास्त्री हे भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील स्वातंत्र्यसैनिक व भारतीय प्रजासत्ताकाचे दुसरे पंतप्रधान होते.

९ जून, इ.स. १९६४ रोजी यांनी पंतप्रधानपदाची सूत्रे हाती घेतली. यांच्या कार्यकाळात इ.स. १९६५सालचे दुसरे भारत-पाकिस्तान युद्ध घडले. सोव्हियेत संघाच्या मध्यस्थीने पाकिस्तानबरोबर युद्धबंदीचा ताश्कंद करार करण्यास यांची महत्वाची भूमिका निभावली.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

उपरोक्त कार्यक्रमाला उपस्थित जी.एम. कामडी, विश्वास सोळस, बी.टी. नंदरधने, शैलेश रामटेके, रूपाली अपराजित, रमेश पोटे ,राहुल गोविंदलवार, श्वेता लक्कावार,नूतन डबले, सुनील राठोड ,पंकज वासनिक, भूषण चंदिले,गोवर्धन करपते ,कमलेश किरमिरे मंगेश आंबोरकर, दिनेश सिडाम, निशा परोपटे व बार्टी प्रकल्प अधिकारी मनीष गणवीर उपस्थित होते.

Comments are closed.