Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

तोरगावात माजी उपसरपंच असलेल्या शेतकऱ्याची आत्महत्या

तोरगावात दोन वर्षातील चौथी घटना.

लोकस्पर्श न्युज नेटवर्क

ईरवा (टेकरी), दि. २ ऑक्टोंबर : ब्रह्मपुरी पासून दहा किलोमीटर अंतरावरील तोरगाव खुर्द येथील माजीउपसरपंच, सामाजिक कार्यकर्ते तथा मनमिळाऊ शेतकरी श्रीकृष्ण वासुदेव पारधी, वय 50 वर्ष , याने आज सकाळी 7 वाजता स्वतःच्या शेतात नैराश्य पोटी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

मागील दोन वर्षात तोरगाव खुर्द येथील प्रल्हाद ढोले, मारोती बावणे, नरहरी बावणे यांनी गळफास लावून आत्महत्या केली होती. आज श्रीकृष्णाने आत्महत्या केल्याने गावातील आत्महत्या करणारी चौथी घटना असल्याने जीवनात ” आत्महत्या” हाच उपाय आहे का? असा प्रश्न तोरगाव वासीय सहित परिसरातील नागरिक करीत आहेत.

शेत जमिनीतील उत्पन्न, खर्चापेक्षा कमी होत असल्यामुळे व निसर्गावर शेती अवलंबून असल्याकारणाने जीवनावश्यक गरजा भागतील इतके उत्पन्न होत नाही. त्यामुळे तोरगाव खुर्द येथील शेतकऱ्यांच्या आत्महत्या ची साखळी श्रीकृष्णाच्या मयतीणे सुरूच असल्याचे दिसते. मयताचा तरुण मुलाचा सुद्धा विष प्राशन करून मागे मृत्यू झाला होता. मयताच्या एका मुलीचे लग्न थाटामाटात, आमदारांच्या उपस्थितीत पार पडले होते.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

दोन वर्षापूर्वी मयत शेतकऱ्याचे नहर फुटून शेतातील उत्पन्नाचे नुकसान झाले होते. मात्र सध्या शेतातील उभे पीक योग्य शेतकऱ्याच्या मनाप्रमाणे असले तरीही अशा सामाजिक कार्यकर्त्याने, शेतकऱ्याने गळफास घेऊन आत्महत्या करावी अशी कोणती परिस्थिती निर्माण झाली होती? अशी गावात चर्चा आहे.

घटनास्थळी ब्रह्मपुरी पोलीस स्टेशन मधील पोलीस चौकशीकरिता आले असून घटनेचा तपास करीत आहेत. पोस्टमार्टम नंतर तोरगावातील स्मशानभूमीत मयताचा अंत्यसंस्कार होत आहे.

मयताच्या मागे पत्नी, एक विवाहित मुलगी, एक अविवाहित मुलगी, दोन भाऊ व त्यांचे कुटुंब, गावातील पारधी तसेच देशमुख परिवार असून आत्महत्येने गावात शोककळा पसरली आहे.
( मयताचा फाशी लागलेला फोटो, आणि दोन वर्षापूर्वी नहर फुटून प्रतिनिधीला शेतीचे नुकसान झाल्याचे दाखवताना मयत शेतकरी)

Comments are closed.