Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

गडचिरोली पोलीस दादालोरा खिडकीच्या माध्यमातून उप पोस्टे दामरंचा येथे आधार कार्ड नोंदणी शिबीर संपन्न

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क 

अहेरी, दि. २ ऑक्टोंबर : गडचिरोली पोलीस दलाच्या वतीने पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु असलेल्या पोलीस दादालोरा खिडकीच्या माध्यमातून उप पोलीस स्टेशन दामरंचा परिसरातील नागरिकांचे आधार कार्ड नोंदणी, आधार कार्ड अद्यतन, आधार कार्ड मोबाईल लिंकिंग साठी दिनांक २८ सप्टेंबर ते १ ऑक्टोंबर पर्यंत उप पोस्टे दामरंचा येथे चार दिवसीय आधार कार्ड शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.  

या दरम्यान नवीन आधार नोंदणी, आधार कार्ड मोबाईल नंबर ला जोडणे, आधार पॅन कार्ड ला जोडणे, आधार बायोमेट्रिक अपडेट करणे तसेच वयोवृद्द नागरिकांचे बस स्मार्ट कार्ड आणि आयुष्यमान भारत योजनेचे ऑनलाईन आवेदन अर्ज भरून देण्यात आले.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

 

अहेरी तालुक्यातील दामरंचा हे गाव ५२ किमी अंतरावर आहे. महत्वाचे कागदपत्र म्हणजे आधार कार्ड काढण्याकरिता येथील नागरिकांना ५२ किमी अंतर पार करून तालुक्याच्या ठिकाणी व आलापल्ली येथे येऊन आधार कार्ड सेंटर मध्ये रांगा लावावी लागते. या कामाकरिता येथील नागरिकांचा संपूर्ण दिवस जातो.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

सदर बाब लक्षात घेऊन उप पोलीस स्टेशन दामरंचा चे प्रभारी अधिकारी पंकज मोरे, पोलीस उपनिरीक्षक बालाजी चव्हाण, पोलीस उपनिरीक्षक सचिन घोडके यांनी पुढाकार घेऊन पोलीस दादालोरा खिडकीच्या उपक्रमांतर्गत आधार कार्ड नोंदणी, आधार कार्ड अद्यतन, आधार कार्ड मोबाईल लिंकिंग साठी दिनांक २८ ते ३० सप्टेंबर रोजी या कॅम्प चे आयोजन केले होते. परंतु नागरिकांचा प्रतिसाद पाहता एक दिवस कॅम्प वाढविण्यात आला. या कॅम्पच्या माध्यमातून उप पोलीस स्टेशन दामरंचा हद्दीतील गरीब व गरजू लोकांना आधार कार्ड, आयुष्यमान भारत कार्ड, बस सेवेचे स्मार्ट कार्ड काढून देण्यात मदत झाली. यासोबतच लाभार्थ्यांच्या वेळेची बचत झाली.

या शिबिरात संगणक तंत्रज्ञ म्हणून अमर चालूरकर, शुभम चालूरकर आणि शुभम कांबळे यांना पाचारण करण्यात आले होते.

 

सदर कॅम्पमध्ये उप पोलीस स्टेशन दामरंचा हद्दीतील जवळपास ११० लोकांनी आधार कार्ड नोंदणी व आधार अद्यतन करण्यासाठी हजेरी लावली होती. त्यापैकी ५३ नागरिकांचे आधार कार्ड नवीन नोंदणी करण्यात आले व ६७ नागरिकांचे आधार कार्ड अद्यतन करण्यात आले. तसेच आयुष्यमान भारत योजनेचे १५० आणि बस स्मार्ट कार्ड चे ५२ आवेदन अर्ज भरण्यात आले.

सदर कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व पोलीस अंमलदार श्रीहरी बडे, सुधीर खोकला, नंदेश्वर झुरे, विष्णु खंडागळे, कैलास नेवारे, सतिष बतुला, राहुल खटके, दिवाकर ढोरे, प्रशांत गरफडे, प्रकाश कुडकर, शत्रुघन भोसले, नर्सिंग कोरे, सुजीत कुमार शिखरे, विलास मुलगीर, विनोद उईके, रतन कस्तुरे, सुधाकर शेकृतीवार, श्रीदेवी वाकुडकर, सीता आलाम, अनिता मडावी, मनीषा येरमा, निशा नागोला, अनिशा बांबोळे, ललिता पेंदाम, आशा प्रवर्तक विद्यादेवी ऐजुलवार व आदींनी सहकार्य केले.

Comments are closed.