Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

शिंदी तोडण्याकरिता जातांना शेतकऱ्यांनी आवश्यक ती काळजी घ्यावी

पीपल फॉर एनवोरमेन्ट & अनिमल वेल्फेअर संस्थे चे अजय कुकडकर यांचे आवाहन.

लोकस्पर्श न्युज नेटवर्क

गडचिरोली, दि. १ ऑक्टोंबर : सध्या गडचिरोली लगत असलेल्या जंगल परिसरात वाघाचा वावर आहे तसेच वाघाच्या हल्ल्यात अनेकांचा बळी गेला आहे. काही दिवसात धान कापणीला सुरुवात होणार असून धानाचे गठ्ठे बांधण्याकरिता शेतकरी शिंदीचा वापर करतात. शिंदीकरीता अनेक शेतकरी जंगलात जातांना निदर्शनास येत आहे. जिल्हा प्रशासनाने जंगलात जाण्यास मनाई केली आहे. मात्र काही शेतकरी शिंदी आणण्याकरिता खोलवर जंगलात जात आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी आवश्यक ती काळजी घ्यावी असे आवाहन पीपल फॉर एनवोरमेन्ट & अनिमल वेल्फेअर संस्थे चे अजय कुकडकर यांनी केले आहे.

गडचिरोली नजीकच्या जंगल परिसरात वाघाचा वावर असून वाघाच्या हल्ल्यापासून वाचण्याकरीत शेतकऱ्यांनी शिंदी आणण्याकरिता शक्यतोवर जंगलात जाऊ नये, रत्याच्या बाजूला असलेल्या शिंदीच्या वापर करावा, जंगलात जातांना एकट्याने जाऊ नये, मला जास्तीत-जास्त शिंदी भेटेल या उद्देशाने पहाटेच्या अंधारात जंगलात जाऊ नये, खोलवर जंगलात जाऊ नये, शक्यतोवर एकट्याने जाऊ नये तर गट तयार करून जावे, एकाने शिंदी कापत असतांना दुसऱ्याने आजूबाजूला लक्ष ठेवावे, शिंदी वाकून कापावे लागते त्यामुळे वाघाला आपला भक्ष असल्याचे वाटते आणि दुर्घटना होऊ शकते त्यामुळे शेतकऱ्यांनी काळजी घ्यावी असे आवाहन पीपल फॉर एनवोरमेन्ट & अनिमल वेल्फेअर संस्थे चे अजय कुकडकर यांनी केले आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

Comments are closed.