Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

सोमवारी गडचिरोली जिल्हयात शालेय लसीकरण दिवस

१५ ते १८ वयोगटासाठी शाळांमधे विशेष मोहिमेअंतर्गत लसीकरणाचे आयोजन

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, 

गडचिरोली, दि. ८  जानेवारी : गडचिरोली जिल्ह्यात विशेष लसीकरण मोहीम सुरू असून यामध्ये १५ ते १८ वयोगटातील विद्यार्थ्यांसाठी शालेय स्तरावरच विशेष मोहीमेचे आयोजन करून सोमवार दिनांक १० जानेवारी रोजी शालेय लसीकरण दिवसाचे आयोजन केले आहे. याबाबत आज जिल्हाधिकारी संजय मीणा, मुख्य कार्यकारी अधिकारी कुमार आशीर्वाद यांच्या उपस्थितीत संबंधित विभाग प्रमुखांची बैठक ऑनलाइन आयोजित करण्यात आली होती. यावेळी बैठकीत शिक्षणाधिकारी, आरोग्य अधिकारी यांना लसीकरणाबाबत विविध सूचना देण्यात आल्या. शाळेतील १५ ते १८ वयोगटातील सर्व ५५१६२ विद्यार्थ्यांचे १००% लसीकरण करणे अवश्यक आहे.

दि.८ जानेवारीला शाळेतील १५ ते १८ वयोगटातील सर्व विद्यार्थ्यांची यादी तयार करणे व गटशिक्षणाधिकारी/ तालुका वैद्यकीय अधिकारी यांच्याकडे जमा करणे याबाबत सूचना देणेत आल्या आहेत. सोमवारला वरील गटातील विद्यार्थी लसीकरणासाठी उपस्थित ठेवणे करीता शालेय स्तरावर सूचना दिल्या आहेत. पालकांना लसीकरणाबाबत तालुका स्तरावरून आवाहन करण्याचेही सांगण्यात आले आहे. तसेच जिल्हा प्रशासनाकडून लसीकरण मोहीम यशस्वी करण्यासाठी पालकांनी आपले पाल्य शाळेत पाठवण्यासाठी त्यांना आवाहन केले आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

जिल्ह्यात ५५ हजार १६२ विद्यार्थी १५ ते १८ वयोगटातील येत असून या दिवशी जास्तीत जास्त विद्यार्थ्यांचे लसीकरण पूर्ण करण्याचे नियोजन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले आहे. आज झालेल्या बैठकीत जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.संजय जठार, डॉ.विनोद म्हशाखेत्री, शिक्षणाधिकारी आर पी निकम, डॉ.पंकज हेमके, डॉ.बनसोडे तसेच तालुकास्तरीय अधिकारी यावेळी ऑनलाइन स्वरूपात उपस्थित होते.

हे देखील वाचा : 

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ फॅशन टेक्नॉलॉजी (NIFT) मध्ये १९० जागांसाठी भरती

मुंबई उच्च न्यायालयाच्या आस्थापनेवरील लिपिक पदांच्या एकूण २४७ जागांंसाठी भरती

महाराष्ट्र कर्मचारी राज्य विमा महामंडळात (ESIC) ५९४ जागांसाठी मेगा भरती

 

 

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.