Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

मोठी बातमी : डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या नंतर ९९ वर्षांनी नाशिकचा सुपुत्र झाला बॅरिस्टर

बाबासाहेबांनी ज्या युनिव्हर्सिटी मध्ये शिक्षण घेतलं त्याच कॉलेजमधून संवेदन संजय अपरांती हा देखील झाला बॅरिस्टर.

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी ज्या युनिव्हर्सिटी मधून बॅरिस्टरची महान पदवी मिळवली त्याच युनिव्हर्सिटी मधून नाशिकच्या एका सुपुत्राने देखील बॅरिस्टरची पदवी मिळवली आहे. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नंतर ९९ वर्षाच्या मोठ्या कालखंडाच्या फरकाने लंडन मधील ग्रेसईन या लॉ कॉलेज मधून ‘संवेदन संजय अपरांती’ याने हा पदवी मिळवण्याचा पराक्रम केला आहे.

संवेदन अपरांती याने २०१७ साली लंडन मधील “ग्रेस ईन” युनिवर्सिटी मध्ये प्रवेश घेतला होता. संवेदन हा नाशिक मधील माजी पोलीस अधिकारी संजय अपरांती यांचा मुलगा असून संजय अपरांती हे शहराचे माजी पोलीस उपायुक्त आणि नंदुरबारचे पोलीस अधीक्षक म्हणून पोलीस सेवेत कार्यरत होते.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

नाशिकचा सुपुत्र संवदेन संजय अपरांती याने बॅरिस्टर पदवी मिळवून डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या नंतर आंबेडकरवादी समाजातील बॅरिस्टर होणारा एकमेव विद्यार्थी ठरला असून, ही बाब आंबेडकरवादी समाजासह नाशिकरांसाठी ही गौरवास्पद असल्याची भावना अपरांती कुटुंबातील सदस्यांनी व्यक्त केली आहे.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

हे देखील वाचा :

स्टाफ सिलेक्शन कमिशनच्या आस्थापनेवर GD कॉन्स्टेबल पदाच्या एकूण 25271 जागांसाठी मेगाभरती

सुरजागड प्रकल्पाला मदत करणाऱ्या “त्या” बड्या लोकांना नक्षल्यांचा पत्रकातून निर्वाणीचा इशारा..

डाॅक्टरांच्या ढेपाळवृत्तीमुळे कांग्रेस अध्यक्षांचा दुर्दैवी मृत्यू!

 

 

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.